Join us

तुमच्याकडे 'स्टार्टअप'ची 'हटके' कल्पना आहे? Eureka! 2022 साठी लगेच करा नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2022 8:06 PM

IIT मुंबईचा अनोखा उपक्रम, जाणून घ्या याबद्दल सारं काही एका क्लिकवर

IIT मुंबईच्या उद्योजकता सेल (Entrepreneurship Cell IIT Bombay) ही विद्यार्थ्यांच्या मार्फत चालवली जाणारी भारतातील एक आघाडीची ना-नफा संस्था आहे. या देशातील लोकांमध्ये उद्यमशीलतेची भावना वाढवण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांद्वारे ही संस्था चालवली जाते. या संस्थेच्या उपक्रमांना युनेस्को, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया इत्यादी संस्था आणि योजनांतर्गत मदत आणि मान्यताही मिळाली आहे. 'ई-सेल आयआयटी बॉम्बे'च्या Eureka! मोहिमेचे हे २५ वे वर्ष आहे. ही त्यांची प्रमुख आणि आशियातील सर्वात मोठी व्यवसाय आराखडा असलेली स्पर्धा आहे. या स्पर्धेत १५ हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्पर्धेची बक्षीस रक्कम ६५ लाखांपेक्षा जास्त आहे. यासोबतच AWS क्रेडिट्स आणि कॅनव्हा (Canva), फ्रेशवर्क्स (Freshworks), ऑटोडेस्क (Autodesk) यांसारख्या सेवांच्या मोफत सबस्क्रिप्शन सह विविध स्वरूपातील ५० लाखांपर्यंतचे प्रोत्साहपर बक्षिसेही समाविष्ट आहेत.

Eureka! (युरेका!) चे उद्देश स्टार्टअप्स आणि स्टार्टअप कल्पनांना मार्गदर्शन, निधी, नेटवर्किंग आणि इतर संधी प्रदान करून बाजारपेठ तयार मदत हे आहे. Eureka! ने आधी झोस्टेल (Zostel), प्रतिलिपी (Pratilipi), देहाट (Dehaat), लीफ (Leaf), अल्तान (Altan) यांसारख्या अनेक स्टार्टअप्सना त्यांनी समर्थन दिले आहे आणि प्रोत्साहन देण्यास मदत केली. Eureka! 2021 च्या विजेत्यांनी दुबई वर्ल्ड एक्स्पो- 2020 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते.

Eureka! मध्ये स्टार्टअप्स के नोंदणीसाठी येथे क्लिक करा- ecell.in/eureka

Eureka! ही स्पर्धा ७ भागांमध्ये विभागली गेली आहे-

1. Yes Bank Business Track: हा Eureka! च्या सर्वात जुन्या ट्रॅकपैकी एक व्यवसाय ट्रॅक आहे. हा दूरदर्शी आणि प्रचंड वेगळा तसेच नाविन्यपूर्ण कल्पना असलेल्या व्यवसायांसाठी योग्य ट्रॅक आहे.

2. CitiusTech Healthcare Track: अधिक चांगल्या तंत्रज्ञानाकडे वाटचाल करणे ही आजच्या काळाची गरज आहे. या ट्रॅकचे उद्दिष्ट हेल्थकेअर क्षेत्रातील नावीन्य टिकवणे आणि नवीन कल्पनांना समर्थन देणे असे आहे.

3. QED Investors FinTech Track: बँकिंग आणि वित्तीय सेवांमध्ये तंत्रज्ञान (फिनटेक, फिनटेक) क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा ट्रॅक योग्य आहे.

4. Union Bank Social Track: सोशल ट्रॅक हा तळागाळातील स्टार्टअप्सना प्रोत्साहन देतो, जे विविध क्षेत्रातील सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतात.

5. BPCL Energy Track: या ट्रॅकचा उद्देश ऊर्जा क्षेत्रात तंत्रज्ञानावर काम करणाऱ्या स्टार्टअप्सना मदत करणे आणि प्रोत्साहन देणे हा आहे.

6. Komet Web 3.0 and Blockchain track: हा पहिल्यांदाच आणलेला ट्रॅक आहे. वेब 3.0 आणि ब्लॉकचेन ट्रॅकचे उद्दिष्ट 'हटके' कल्पनांना नवीनतम तंत्रज्ञानासह कार्य करण्यास मदत करणे आहे.

7. Westbridge Capital Pan-IIT Track: हा ट्रॅक IITians कडून तयार केलेल्या कल्पनांसाठी आहे, ज्यांचे स्टार्टअप जगामध्ये पुढील मोठे उद्योजक बनण्याचे आहे.

Eureka! ची अंतिम स्पर्धा ई-समिट'23 येथे आयोजित केली जाईल. ती आशियातील सर्वात मोठी व्यवसाय परिषद आहे आणि दरवर्षी दोन दिवसांच्या कालावधीत आयोजित केली जाते. तसेच Eureka! अनेक समर्थन, मदत, नवीन संधी, निधी इ. एकूणच, स्टार्टअप्सच्या शोधात असलेल्या नवीन उद्योजकांसाठी पर्वणी असते. जर तुम्हाला असेही वाटत असेल की तुमच्याकडे अशी कल्पना आहे, जी लोकांचे जीवन बदलू शकते आणि नव्या गोष्टी बनवण्याची क्षमता आहे, तर तुम्हीही ecell.in/eureka वर नोंदणी करू शकता.

टॅग्स :मुंबईआयआयटी मुंबईव्यवसाय