नवी दिल्ली : ई-कॉमर्स, अन्नप्रक्रिया आणि विपणन क्षेत्रांमधील थेट विदेशी गुंतवणुकीला(एफडीआय) रा.स्व.संघाशी संलग्न स्वदेशी जागरण मंचने(एसजेएम) जोरदार विरोध दर्शविला आहे. भोपाळ येथे २१ आणि २२ मे रोजी होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत मोदी सरकारच्या प्रमुख आर्थिक सुधारणांना विरोध करणारा ठराव पारित केला जाईल.
छोट्या दुकानदारांच्या विरोधात जाणारा हा निर्णय मागे घ्यावा, अशी विनंती आम्ही सरकारला करणार आहोत. आमच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीत त्याबाबत ठराव पारित केला जाईल, असे एसजेएमचे राष्ट्रीय सह समन्वयक अश्विनी महाजन यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
ई-कॉमर्समध्ये एफडीआयला संघाच्या ‘स्वदेशी’चा विरोध
ई-कॉमर्स, अन्नप्रक्रिया आणि विपणन क्षेत्रांमधील थेट विदेशी गुंतवणुकीला(एफडीआय) रा.स्व.संघाशी संलग्न स्वदेशी जागरण मंचने(एसजेएम) जोरदार विरोध दर्शविला आहे.
By admin | Published: May 10, 2016 03:30 AM2016-05-10T03:30:55+5:302016-05-10T03:30:55+5:30