Lokmat Money > बिझनेस न्यूज > अ‍ॅमेझॉनचे कर्मचारी चिंतेत! तब्बल १४,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ? भारतीयांना बसणार फटका?

अ‍ॅमेझॉनचे कर्मचारी चिंतेत! तब्बल १४,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ? भारतीयांना बसणार फटका?

Amazon Layoffs: अमेरिकन ई-कॉमर्स क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या ॲमेझॉनने कर्मचारी कपातीची मोठी घोषणा केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 15:52 IST2025-03-18T15:52:31+5:302025-03-18T15:52:31+5:30

Amazon Layoffs: अमेरिकन ई-कॉमर्स क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या ॲमेझॉनने कर्मचारी कपातीची मोठी घोषणा केली.

E-Commerce Giant To Lay Off up to 14,000 Employees Globally To Save Billions, Limit Hiring in Early 2025 | अ‍ॅमेझॉनचे कर्मचारी चिंतेत! तब्बल १४,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ? भारतीयांना बसणार फटका?

अ‍ॅमेझॉनचे कर्मचारी चिंतेत! तब्बल १४,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ? भारतीयांना बसणार फटका?

Amazon Layoffs: सध्या जगभर मंदीचे सावट असून अनेक दिग्गज कंपन्या कर्मचारी कपात करत आहे. यापूर्वी अ‍ॅपल, सॅमसंग सारख्या दिग्गज टेक कंपन्यांनी जगभरातील युनिटमधून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. इन्फोसिस, टीसीएस सारख्या भारतीय कंपन्यांचाही यात समावेश आहे. यामध्ये आणखी एका मोठ्या कंपनीची भर पडणार आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या ॲमेझॉनने कर्मचारी कपातीची मोठी घोषणा केली. यामध्ये भारतीय कर्मचाऱ्यांचाही समावेश असू शकतो.

१४००० कर्मचारी होणार बेरोजगार?
खर्चात कपात करण्यासाठी अ‍ॅमेझॉन यावर्षी हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची शक्यता आहे. कंपनी यावर्षी सुमारे १३% कर्मचारी कमी कपात करण्याचा अंदाज आहे. त्यानुसार, तब्बल १४,००० कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले जाऊ शकते. एआयच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि जास्तीत जास्त नफा मिळवण्यावर कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

नफा वाढवण्यासाठी अ‍ॅमेझॉनचा निर्णय
फायनान्शियल एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, अ‍ॅमेझॉन नोकर कपातीची लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. यानंतर कंपनीला दरवर्षी सुमारे २.१ ते ३.६ अब्ज अमेरिकन डॉलर बचत करण्यात मदत होईल. या टाळेबंदीचा जागतिक कामगारांवर परिणाम होईल. एकूण कर्मचाऱ्यांची संख्या १,०५,७७० वरून ९१,९३६ पर्यंत कमी होईल. कंपनीमध्ये दरवर्षी अशा प्रकारे नोकर कपात केली जाते. उत्पादन क्षमता वाढवणे आणि पुनर्रचना करणे हा या योजनेचा भाग आहे. 

अ‍ॅमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी ई-कॉमर्स दिग्गज कंपनीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक धोरण जाहीर केले. अहवालानुसार, अँडी जॅसी यांनी २०२५ च्या पहिल्या तिमाहीत व्यवस्थापकांना वैयक्तिक योगदान १५% ने वाढवण्याची योजना शेअर केली. टाळेबंदीमुळे कर्मचारी संख्या कमी करण्यास आणि कामकाजाला गती देण्यास मदत होईल, असं मत अँडी जॅसी यांनी व्यक्त केलं.

या अहवालात मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालाचा हवाला देण्यात आला आहे. त्यानुसार, अमेझॉनमधील नोकर कपातीचा परिणाम पुढील वर्षी सुमारे १३,८४३ कर्मचाऱ्यांवर होऊ शकतो. या निर्णयामुळे कंपनीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार असून नफ्यात वाढ होईल. नोकर कपातीनंतर कंपनी पगार रचनेचा आढावा घेणार असून वरिष्ठ पदांसाठी भरती मर्यादित करणार असल्याचे म्हटले जात आहे.

Web Title: E-Commerce Giant To Lay Off up to 14,000 Employees Globally To Save Billions, Limit Hiring in Early 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.