नवी दिल्ली : विदेशात कर चुकवून दडविलेला काळा पैसा जाहीर करण्यास सरकारने दिलेल्या मुदतीचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्ती ई फायलिंगची सुविधाही वापरू शकते.
काळा पैसा जाहीर करण्यासाठी सरकारने एक खिडकी योजना जाहीर केली आहे. यासाठी व्यक्ती किंवा संस्थेला पारंपरिक फॉर्मही भरता येतो. ई फायलिंगसाठी मात्र ‘डिजिटल सिग्नेचर’ आवश्यक आहे. लेखी स्वरूपातील दस्तावेजांचे स्वाक्षरीने जसे प्रमाणीकरण होते तसेच डिजिटल सिग्नेचरमुळे ई फायलिंगचे होते. विदेशात कर चुकवून ठेवलेला पैसा जाहीर करण्यासाठी या एक खिडकी योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यास हे काम खूप कमी वेळेत आणि पूर्ण गुप्तता राखून पार पाडता येईल असा आॅनलार्ईन फायलिंग सुविधेचा उद्देश आहे. काळ्या पैशांच्या माहितीचा दस्तावेज (कागदपत्रे) दिल्लीतील कार्यालयाला टपालानेही पाठविता येतील; परंतु ई फायलिंग ही सुविधा खूपच सुरक्षित आणि सहज वापरता येणारी आहे. काळ्या पैशाची माहिती सादर करणारी संपूर्ण प्रक्रिया ही अतिशय गुप्त राखली जाते, असे कर खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
या उद्देशासाठी दोन पानी नवा फॉर्म उपलब्ध करण्यात आला आहे. त्यासोबत भारताबाहेरच्या अघोषित संपत्तीचे निवेदन करण्यासाठी तीन पानी स्वतंत्र पुरवणीही आहे.
काळा पैसा जाहीर करण्यासाठी सरकारने १ जुलैपासून तीन महिन्यांची एक खिडकी मुदत योजना जाहीर केली आहे. या जाहीर केलेल्या बेहिशेबी संपत्तीवर व पैशांवर ३१ डिसेंबरपर्यंत कर आणि दंड भरता येईल. जे इच्छुक या योजनेचा लाभ घेतील त्यांना ३० टक्के कर आणि तेवढीच रक्कम दंड म्हणून भरावी लागेल.
गेल्या मे महिन्यात संसदेने काळ्या पैशांविरुद्धचा नवा कायदा संमत केला व त्याला २६ मे रोजी राष्ट्रपतींनी मान्यता दिली. या कायद्यांतर्गत ही एक खिडकी योजना जाहीर करण्यात आली आहे. विदेशात कर चुकवून ठेवण्यात आलेल्या संपत्तीत अचल मालमत्ता, दागिने, शेअर्स आणि दुर्मिळ कलाकृतींचा समावेश आहे.
काळ्या पैशासाठी ई-फायलिंगची सोय
नवी दिल्ली : विदेशात कर चुकवून दडविलेला काळा पैसा जाहीर करण्यास सरकारने दिलेल्या मुदतीचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्ती ई फायलिंगची सुविधाही वापरू शकते.
By admin | Published: July 5, 2015 10:32 PM2015-07-05T22:32:25+5:302015-07-05T22:32:25+5:30