Lokmat Money > बिझनेस न्यूज > ई-बाजार दहा वर्षांत २०० अब्ज डॉलरवर

ई-बाजार दहा वर्षांत २०० अब्ज डॉलरवर

भारतात येत्या काळात ई बाजारात उल्लेखनीय तेजी येऊन त्यातील उलाढाल २०० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचलेली असेल, असे बँक आॅफ अमेरिका- मेरिल लिंचच्या (बोफा-एमएल) अहवालात म्हटले आहे.

By admin | Published: November 10, 2015 10:29 PM2015-11-10T22:29:47+5:302015-11-10T22:29:47+5:30

भारतात येत्या काळात ई बाजारात उल्लेखनीय तेजी येऊन त्यातील उलाढाल २०० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचलेली असेल, असे बँक आॅफ अमेरिका- मेरिल लिंचच्या (बोफा-एमएल) अहवालात म्हटले आहे.

The e-market in the past 10 years is $ 200 billion | ई-बाजार दहा वर्षांत २०० अब्ज डॉलरवर

ई-बाजार दहा वर्षांत २०० अब्ज डॉलरवर

नवी दिल्ली : भारतात येत्या काळात ई बाजारात उल्लेखनीय तेजी येऊन त्यातील उलाढाल २०० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचलेली असेल, असे बँक आॅफ अमेरिका- मेरिल लिंचच्या (बोफा-एमएल) अहवालात म्हटले आहे.
सेवा क्षेत्रातील या जागतिक कंपनीने दूरसंचारच्या पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या सुधारणा, ग्राहकांनी आॅनलाईन सेवा उत्साहाने आत्मसात करणे आणि चांगल्या दर्जाच्या विविध वस्तूंची उपलब्धता व सेवेमुळे ई वाणिज्य क्षेत्रातील ग्राहकांची संख्या येत्या १० वर्षांत ५३ कोटींपर्यंत जाऊ शकते, असे म्हटले. बोफा-एमएलने आपल्या संशोधन अहवालात आमच्या अंदाजानुसार २०२५ पर्यंत एकूण वाणिज्य वस्तूंचे मूल्य १० टक्क्यांनी वाढून २२० अब्ज डॉलरपर्यंत जाईल. अधिक वेगवान असे फोर जी नेटवर्क आल्यामुळे आॅनलाईन विक्री वाढण्यास मदत मिळेल. ग्राहकांकडून आॅनलाईन खरेदी वाढल्यामुळे ग्राहकांच्या मानसिकतेमध्येही बदलाची आम्हाला आशा आहे.

Web Title: The e-market in the past 10 years is $ 200 billion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.