Lokmat Money > बिझनेस न्यूज > ई-पेमेंट जरा सांभाळून!

ई-पेमेंट जरा सांभाळून!

जो तो आजकाल आॅनलाइन पेमेंट करताना दिसतो. देशभरात आता क्रेडिट किंवा डेबिट कार्डाद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांची संख्या वाढत चालली आहे. एकूणच कॅशलेस समाजाकडे आपली

By admin | Published: August 16, 2015 01:33 AM2015-08-16T01:33:13+5:302015-08-16T01:33:13+5:30

जो तो आजकाल आॅनलाइन पेमेंट करताना दिसतो. देशभरात आता क्रेडिट किंवा डेबिट कार्डाद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांची संख्या वाढत चालली आहे. एकूणच कॅशलेस समाजाकडे आपली

E-payment is a little confused! | ई-पेमेंट जरा सांभाळून!

ई-पेमेंट जरा सांभाळून!

- तुषार भामरे

जो तो आजकाल आॅनलाइन पेमेंट करताना दिसतो. देशभरात आता क्रेडिट किंवा डेबिट कार्डाद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांची संख्या वाढत चालली आहे. एकूणच कॅशलेस समाजाकडे आपली वाटचाल चालू आहे. या व्यवहारांच्या लेखी नोंदी होत असल्याने काळ्यापैशावरही आता आपोआप अंकुश लावला जातोय. ई-शॉपिंग, मर्चंट पेमेंट, हॉटेल्स आणि मोबाइलची बिलं आज एका क्लिकवर फेडली जात आहेत. वेळ वाचवण्याच्या तसेच पेमेंटच्या सोप्या पद्धतीमुळे बहुतेकवेळा लोक अनेक गंभीर आर्थिक समस्यांमध्ये अडकले जातात. अशावेळी आपण अनेक लहानमोठ्या चुका करतो ज्या टाळायला हव्यात, नाहीतर मोठ्या आर्थिक भुर्दंडाला किंवा समस्येला सामोरं जाऊ लागू शकतं.


ह्यँ३३स्रह्ण, ह्यँ३३स्र२ह्णचं भान : आॅनलाइन खरेदी करताना एक गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे ज्या संकेतस्थळावर तुम्ही खरेदी करताय ते संकेतस्थळ ँ३३स्र (हायपर टेक्स्ट ट्रान्सफॉर्म प्रोटोकॉल) आहे की ँ३३स्र२ (हायपर टेक्स्ट ट्रान्सफॉर्म प्रोटोकॉल सिक्यूर). ँ३३स्र२ वर आधारित संकेतस्थळं ही ँ३३स्रची आधुनिक आवृत्ती आहे जे तुम्ही संगणकाला पुरवलेल्या माहितीला अधिक सुरक्षितपणे हाताळतात आणि सांभाळतात. यामध्ये ज्या ब्राऊझरमधून तुम्ही संकेतस्थळाला भेट देत आहात त्या संकेतस्थळाला ब्राऊझरमार्फत पाठवलेली माहिती एनक्रिप्टेड म्हणजेच सुरक्षित राहते. त्यामुळे आॅनलाइन पेमेंट करणं तेव्हाच सुरक्षित जेव्हा संकेतस्थळ हे ँ३३स्र२ असेल.

तुमच्या बँकेची जबाबदारी : अनेक बँका आज नेटबँकिंगसारख्या आणि तत्सम सुविधा पुरवत आहेत. त्यासाठी लागणाऱ्या सर्व त्या खात्रीशीर उपाययोजनांची पूर्तता बँकेकडून केली जात आहे की नाही याची चौकशी ग्राहकांनी स्वत:हून आपल्या बँकेच्या शाखेत करायला हवी आणि त्याबद्दल जागरूकही राहायला हवे.

सायबर फसवेगिरी झाल्यावर काय कराल? जेव्हा तुम्हाला माहीत पडेल की तुमच्यासोबत सायबर फसवेगिरी झाली आहे त्या वेळी तत्काळ तुमचं क्रेडिट-डेबिट कार्ड ब्लॉक करा. सोबतच या फसवेगिरीची तक्रार पोलिसांत नोंदवा. कार्ड हरवल्यास किंवा चोरी झाल्यास आपलं खातं असलेल्या बँकेच्या शाखेत फोन करून कार्ड लगेच लॉक करावं.

मोबाइलमध्ये डेबिट-क्रेडिट कार्डाची माहिती ठेवू नका : कित्येक वेळा आपण स्वत:च्या सुविधेसाठी आपल्या क्रेडिट-डेबिट कार्डाचे पिन, कार्ड नंबर आणि इतर माहिती मोबाइलवर साठवून ठेवतो. अशा वेळी मोबाइल चोरी झाल्यास तुमच्या कार्डाची माहिती वापरून व्यवहार केला जाऊ शकतो. कार्डाची माहिती मोबाइलवर साठवून ठेवल्याने सायबर फसवेगिरीला एक प्रकारे मदतच होते. त्यामुळे या सवयी टाळा.

मोबाइल जवळ बाळगा : आॅनलाइन खरेदीला आणखी सुरक्षित करण्यासाठी आरबीआयने फेब्रुवारी २०११पासून ओटीपी (वन टाइम पासवर्ड) अनिवार्य केला आहे. आॅनलाइन व्यवहार करतेवेळी आपला तत्सम संकेतस्थळावर नोंदणी केलेला मोबाइल क्रमांक अथवा ई-मेल आयडी जवळ ठेवावा. जेणेकरून आॅनलाइन व्यवहार करताना संकेतस्थळाकडून पाठवला गेलेला ओटीपी तुम्हालाच मिळेल.

पासवर्ड टाकताना सावध
मॉल, मल्टिप्लेक्सेस, हॉटेल्स, फास्टफूड सेंटर्स अशा ठिकाणी जेव्हा तुम्ही क्रेडिट अथवा डेबिट कार्डाने पेमेंट करता तेव्हा सावधगिरीने आणि कोणाला न दिसेल या पद्धतीने पासवर्ड टाका. त्याचबरोबर मॉलमधल्या सीसीटीव्हीच्या आड राहूनच आपला पासवर्ड टाका.

एंटिव्हायरस
अनेक स्मार्टफोन वापरकर्ते आॅनलाइन व्यवहार करण्यापूर्वी आपला स्मार्टफोन त्यासाठी सुरक्षित आहे किंवा नाही याची खात्री न करता व्यवहार करतात. बहुतेक वेळा व्हायरसने बाधलेले संगणक, फसवे ई-मेल, फसव्या अ‍ॅप्स, पॉर्न संकेतस्थळं यांच्या संपर्कात आल्यामुळे स्मार्टफोनही बाधित होतो ज्याचे दुष्परिणाम तुमच्या आॅनलाइन व्यवहारांमध्ये दिसू शकतात. त्यामुळे अशा वापरकर्त्यांनी स्मार्टफोनमध्ये योग्य तो एंटिव्हायरस इन्स्टॉल करणं गरजेचं आहे. बाजारात क्विकहिल, एव्हीजी आणि इतर बरेच पर्याय उपलब्ध आहेत.

Web Title: E-payment is a little confused!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.