Join us  

'ही' सरकारी योजना सर्वसामान्यांसाठी ठरतेय लाभदायी, फक्त रजिस्ट्रेशन केल्यास मिळतो २ लाखांचा विमा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2024 3:14 PM

e-Shram : या योजनेद्वारे तुम्ही दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण कसे, मिळवू शकता ते जाणून घ्या.

नवी दिल्ली : देशात सध्याच्या घडीला करोडो मजूर असंघटित क्षेत्रात काम करतात. याठिकाणी नोकरीची सुरक्षितता असे काही नसते. आज तुमच्याकडे नोकरी आहे, मात्र, उद्या तुम्ही बेरोजगार होऊ शकता, अशा लोकांना मदत करण्यासाठी कामगार आणि रोजगार मंत्रालयाने एक योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव ई-श्रम योजना आहे. 

अलीकडेच, सरकारने जारी केलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, असंघटित क्षेत्रातील कामगारांचे राष्ट्रीय डेटाबेस पोर्टल ई-श्रमने तीन वर्षांच्या कालावधीत ३० कोटी नोंदणीचे (रजिस्ट्रेशन) लक्ष्य ओलांडले आहे. दरम्यान, या योजनेद्वारे तुम्ही दोन लाख रुपयांचे विमा संरक्षण कसे, मिळवू शकता ते जाणून घ्या. तसेच, जर तुम्ही ई-श्रम योजनेअंतर्गत नोंदणी केली तर सरकारकडून तुम्हाला अनेक फायदे दिले जातात. 

आर्थिक मदतीव्यतिरिक्त, या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून २ लाख रुपयांच्या अपघात विम्याचा लाभ दिला जातो. देशातील सर्व मजूर जसे की, फेरीवाले, भाजी विक्रेते, घरकामगार तसेच लहान नोकरी करणारे युवक ई-श्रम कार्ड योजनेचा लाभ घेऊ शकतात. तसेच, जर कोणी टॅक्स भरत असेल किंवा व्यावसायिक असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

'यांना' मिळतील फायदे!ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर काही दिवसांनी मजूर आणि कामगारांचे कार्ड बनवले जाते. या पोर्टल अंतर्गत देशातील सर्व मजुरांना एका प्लॅटफॉर्मवर जोडले जात आहे. या कारणास्तव, केंद्र सरकारने भविष्यात कोणतीही योजना सुरू केल्यास या पोर्टलच्या मदतीने नोंदणीकृत कामगार आणि मजुरांना त्याचा लाभ दिला जाईल. या पोर्टलवर नोंदणी करणाऱ्यांना सध्या दोन लाख रुपयांचा अपघात विमा दिला जात आहे.

अशी आहे अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया- या पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे. - अर्जदाराकडे आधार कार्ड, पासपोर्ट आकाराचा फोटो, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक इत्यादी कागदपत्रे असणे आवश्यक आहे. - ई-श्रम कार्ड मिळविण्यासाठी, तुम्हाला ऑनलाइन नोंदणी करावी लागेल.- ज्यासाठी तुम्हाला प्रथम ई-श्रम पोर्टलवर जावे लागेल आणि नोंदणी करावी लागेल. - नोंदणी करताना तुमचा मोबाईल नंबर टाका. यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल. -  त्यानंतर हा  OTP टाका. यानंतर ई-श्रम कार्ड फॉर्म भरा आणि सबमिट करा. -  यानंतर तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. यानंतर तुम्ही तुमचा ई-श्रम ऑनलाइन डाउनलोड करू शकता आणि ते सुरक्षित ठेवू शकता.

टॅग्स :व्यवसाय