जर तंत्रज्ञान प्रगत होत जातंय तशा फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होताना दिसतेय. अशातच एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल यांनी आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक पत्र लिहिलंय. यामध्ये त्यांनी आपल्या ग्राहकांना ई सिम वापरण्याची विनंती केली आहे.
ग्राहकांनी जर ई सिमचा वापर केला तर त्याचे असंख्य फायदे आहेत. ई सिमला सपोर्ट करणारे सर्व स्मार्टफोन्स एअरटेलसोबत उत्तम काम करत आहेत. ग्राहक एअरटेल थँक्स अॅपद्वारे आपलं सामान्य सिमकार्ड ई सिममध्ये बदलू शकतात, असं गोपाल विट्टल यांनी म्हटलंय. जर चोरीसारखी घटना घडली तर गुन्हेगारांना ई सिमपासून सुटका मिळवणं कठीण आहे. ते पारंपारिक सिमकार्ड पेक्षा निराळे आहेत. यामुळे हरवलेला स्मार्टफोन ट्रॅक करणंही सोप होत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
काय आहे ई सिम
एम्बेडेड सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्युल म्हणजेच ई-सिम हे मोबाईल फोन, स्मार्ट वॉच, टॅब्लेट इत्यादींमध्ये वापरलं जाणारं व्हर्च्युअल सिम आहे. हे प्रत्यक्ष सिमपेक्षा पूर्णपणे वेगळं आहे, त्यामुळे तुम्ही हा पर्याय निवडल्यास, तुम्हाला तुमच्या फोनमध्ये कोणतेही सिम कार्ड घालावं लागणार नाही. याचे अनेक फायदे असल्याचं सांगितलं जातं. एक फायदा म्हणजे यासाठी मोबाईल फोनमध्ये सिम ट्रे बसवण्याची गरज नाही. त्यामुळे, जागा वाचवली जाते जी इतर कारणांसाठी वापरली जाऊ शकते.
e-SIM Card: एअरटेलच्या गोपाल विट्टल यांनी का लिहिलंय आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी पत्र, जाणून घ्या...
एअरटेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल विट्टल यांनी आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी एक पत्र लिहिलंय.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 11:55 AM2023-11-22T11:55:27+5:302023-11-22T11:55:58+5:30