Lokmat Money > बिझनेस न्यूज > ई-वॉलेटद्वारे होणारे आर्थिक व्यवहार ८ टक्क्यांनी वाढले

ई-वॉलेटद्वारे होणारे आर्थिक व्यवहार ८ टक्क्यांनी वाढले

नोटाबंदीनंतर वाढ : लोकांकडून दरमहा साडेतीन हजार रुपयांची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 07:12 AM2019-01-08T07:12:40+5:302019-01-08T07:13:08+5:30

नोटाबंदीनंतर वाढ : लोकांकडून दरमहा साडेतीन हजार रुपयांची खरेदी

The e-wallet-led financial transaction grew by 8 percent | ई-वॉलेटद्वारे होणारे आर्थिक व्यवहार ८ टक्क्यांनी वाढले

ई-वॉलेटद्वारे होणारे आर्थिक व्यवहार ८ टक्क्यांनी वाढले

नवी दिल्ली : भारतात आता इ वॉलेटचा वापर तब्बल ८ टक्क्यांनी वाढला असून, भारतातील एक व्यक्ती डिजिटल पद्धतीने दरमहा सरासरी तीन हजार रुपये खर्च करते, अशी माहिती डिजिटल वॉलेट यंत्रणेचे प्रमुख साहिल कुमार यांनी दिली. विशेषत: नोटाबंदीनंतरच्या काळात देशात ई वॉलेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून आला आहे. आजच्या घडीला मोबाइलवर अँड्रॉइड आयओएस प्ले स्टोअरवर त्यासाठीचे १५0 हून अधिक अ‍ॅप उपलब्ध आहेत. त्याखेरीज जवळपास सर्व बँकांनीही ग्राहकांच्या उपयोगासाठी आपापले अ‍ॅप विकसित केलेले आहेत. खरेदीसाठी व विशेषत: खाद्यपदार्थांवर मोठ्या प्रमाणात दिली जाणारी सवलतच ई वॉलेटचा वापर वाढण्यास कारणीभूत ठरली आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सन २0१५ नंतर ई वॉलेटचा वापर वाढत गेला. २0१७ साली सुमारे २५ टक्के भारतीयांनी ई वॉटेलद्वारे खरेदी करणे पसंत केले. त्यानंतरच्या वर्षात म्हणजे २0१८ साली त्यात ८ टक्क्यांनी वाढ झाली. आजच्या घडीला देशात ३३ टक्के लोक ई वॉलेटचा वापर करीत आहेत. संख्येत सांगायचे तर दोन वर्षांमध्ये इ वॉलेटचा वापर करणाऱ्यांत सुमारे २४ कोटींनी वाढ झाली. आता देशातील ४६ कोटी लोक इ वॉलटद्वारे दरमहा खरेदी करीत असतात. मुख्य म्हणजे इ वॉलेटद्वारे खरेदीचे प्रमाण केवळ शहरी भागांतच नव्हे, तर ग्रामीण भागांमध्येही वाढत आहे. त्यात अर्थातच तरुणांचे प्रमाण जास्त असले तरी मध्यमवयीन लोक आणि महिलाही इ वॉलेटकडे वळत आहेत.

वरिष्ठांमध्ये मात्र अजूनही भीती
मात्र मध्यमवयीन तसेच ज्येष्ठ मंडळींना इ वॉलेटमध्ये सुरक्षितता कमी आहे, असे वाटते. त्यात फसवणूक होण्याची त्यांना भीती वाटते, असे त्यांच्याशी बोलताना आढळून आले. ही मंडळी त्यामुळे डेबिट कार्डालाच अधिक प्राधान्य देतात आणि त्यापाठोपाठ नेट बँकिंगचा वापर अधिक होतो. अशा प्रकारे आर्थिक व्यवहार करणाºयांचे प्रमाण ६0 टक्के असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: The e-wallet-led financial transaction grew by 8 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.