करनीती भाग २३१ - सी. ए. उमेश शर्माअर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात राज्यांतर्गत वाहतुकीसाठी ई-वे बिल अनिवार्य होईल, परंतु वाहतूकजर ५० किमीपेक्षा कमी अंतरासाठी असेल, तरीही ई-वे बिल अनिवार्य असेल का?कृष्ण (काल्पनिक पात्र): अर्जुना, वाहतुकीचे अंतर ५० किमीपेक्षा कमी असले, तरीही ई-वे बिल निर्मित करणे अनिवार्य आहे.अर्जुन : कृष्णा, ५० किमीचे अंतर कसे मोजावे?कृष्ण : अर्जुना, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वस्तू पाठवायच्या असतील, तर दोन्ही ठिकाणांमधील अंतर हे अंदाजेच मोजावे. हे अंतर नकाशाच्या साहाय्याने मोजले, तरी चालेल.अर्जुन : कृष्णा, वाहतुकीचे अंतर ५० किमीपेक्षा कमी असेल, तर ई-वे बिल निर्मित करणे कोणा-कोणाला गरजेचे आहे?कृष्ण : अर्जुना, वाहतुकीचे अंतर ५० किमीपेक्षा कमी असले, तरीही सर्वांनाच ई-वे बिल निर्मित करणे गरजेचे आहे. उदा- एका होलसेलरने एखाद्या रिटेलरला वस्तू पुरविल्या आणि त्या वस्तूंच्या वाहतुकीचे अंतर ४ किमी जरी असले, तरीही ई-वे बिल निर्मित करणे आवश्यक आहे.अर्जुन : कृष्णा, ई-वे बिल निर्मित करण्यापासून वाहतूकदाराला काही सूट आहे का?कृष्ण : अर्जुना, वाहतुकीचे अंतर जर ५० किमीपेक्षा कमी असेल, तर ई-वे बिलमध्ये भाग ‘ब’मध्ये तपशील देण्याची आवश्यकता नाही.उदा- १. ‘अ’ व्यापाºयाने मुंबई येथून वस्तू आणल्या आणि ‘ब’ वाहतूकदाराने त्या वाळूजमध्ये उतरविल्या. त्यानंतर, ‘ब’ने त्या वस्तू लोडिंग रिक्षाद्वारे औरंगाबादला आणल्या, तर मुंबई येथून वाळूजमध्ये होणाºया वाहतुकीसाठी ई-वे बिल निर्मित करणे अनिवार्य असेल, परंतु वाळूज येथून औरंगाबादला झालेल्या वाहतुकीसाठी ई-वे बिलमध्ये भाग ‘ब’मध्ये तपशील देण्याची आवश्यकता नाही.अर्जुन : कृष्णा, ५० किमीपेक्षा कमी अंतराच्या वाहतुकीसाठी ई-वे बिल निर्मित करण्याला काही अपवाद आहे का?कृष्ण : अर्जुना, वस्तूंची वाहतूक जर मानव किंवा बैलगाडीद्वारे झाली, तर या प्रकरणामध्ये ई-वे बिल निर्मित करण्याची गरज नाही.उदा- ‘अ’ रिटेलरने त्याचा एखादा माणूस ‘ब’ होलसेलरकडे वस्तू आणण्यासाठी पाठविला आणि त्या माणसाने रु. ५० हजारांपेक्षा अधिक मूल्याच्या वस्तू पायीच आणल्या, तर त्याला ई-वे बिल निर्मित करण्याची गरज नाही, परंतु त्याच वस्तू जर स्कूटरद्वारे आणल्या, तर त्यासाठी ई-वे बिल निर्मित करणे आवश्यक आहे.अर्जुन : कृष्णा, करदात्याने यातून काय बोध घ्यावा?कृष्ण : अर्जुना, वाहतुकीचेअंतर ५० किमीपेक्षा कमी असोकिंवा जास्त असो, ई-वे बिलनिर्मित करणे सर्वांसाठीच गरजेचे आहे. ही गोष्ट करदात्यांसाठीआणि वाहतूकदारांसाठी अतिशय त्रासदायक आहे.
ई-वे बिल आणि ५० किलोमीटरची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 1:37 AM