Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘पिकाझ्झी’ची गरुडभरारी

‘पिकाझ्झी’ची गरुडभरारी

स्टार्टअप क्षेत्रात ‘पिकाझ्झी’ने अल्पावधीत भरारी घेतली आहे. कंपनीच्या फोटो इफेक्ट अ‍ॅपने अब्जावधीच्या इमेज प्रोसेसिंग

By admin | Published: June 1, 2017 12:44 AM2017-06-01T00:44:39+5:302017-06-01T00:44:39+5:30

स्टार्टअप क्षेत्रात ‘पिकाझ्झी’ने अल्पावधीत भरारी घेतली आहे. कंपनीच्या फोटो इफेक्ट अ‍ॅपने अब्जावधीच्या इमेज प्रोसेसिंग

Eagle Fillers of Pikazzjie | ‘पिकाझ्झी’ची गरुडभरारी

‘पिकाझ्झी’ची गरुडभरारी

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्टार्टअप क्षेत्रात ‘पिकाझ्झी’ने अल्पावधीत भरारी घेतली आहे. कंपनीच्या फोटो इफेक्ट अ‍ॅपने अब्जावधीच्या इमेज प्रोसेसिंग उद्योगात आपले स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. हे केवळ फोटो
एडिटिंग अ‍ॅप नसून, फोटोंच्या माध्यमातून सोशल मीडियाचा व्यवसायवाढीसाठी उपयोग करून घेता येईल, असे उपयुक्त आणि वापरस्नेही अ‍ॅप आहे.
सूत्रांनी सांगितले की, पिकाझ्झी हे एक व्यवसाय मॉडेल असून, ते दोन पातळ्यांवर प्रभावी काम करते. एक म्हणजे सोशल मीडिया वापरणाऱ्यांना अत्याधुनिक कलात्मक फोटो इफेक्ट देऊन, तसेच एडिटिंग टूल्स वापरून परिणामकारकता वाढविता येते. त्याद्वारे आपल्या ब्रँडचा प्रसार करणे सोपे जाते. दुसरे म्हणजे मजबूत ग्राहक संबंध निर्माण करून त्यांना ब्रँड अ‍ॅम्बेसेडरमध्ये रूपांतरित करता येते. त्यातून आपल्या बँ्रड्स आणि इव्हेंट्सला मजबूत प्लॅटफॉर्म मिळतो. पिकाझ्झीला अ‍ॅपस्टोअर आणि प्लेस्टोअरचे मजबूत ४.४ रेटिंग आहे, तसेच वापरकर्त्यांचा प्रोत्साहक प्रतिसादही आहे. पिकाझ्झी ही स्टार्टअप कंपनी असली, तरी पिंकथॉनची सेल्फी पार्टनर होती. एप्रिल २0१७मध्ये झालेल्या दिल्लीतील निवडणुकीसाठी पिकाझ्झीने भाजपासोबत डिजिटल भागीदारी केली होती.

Web Title: Eagle Fillers of Pikazzjie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.