Join us  

आधी गाजावाजा केला, मुकेश अंबानींनी गुपचूप बंद केली ही सेवा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 12:45 PM

रिलायन्स रिटेलची कंपनी जिओमार्टने गेल्या वर्षी मोठा गाजावाजा करून एक सेवा सुरु केली होती.

रिलायन्स रिटेलची कंपनी जिओमार्टने गेल्या वर्षी मोठा गाजावाजा करून एक सेवा सुरु केली होती. ती आता गुपचुप बंद करून टाकली आहे. ऑर्डर दिल्याच्या ९० मिनिटांत सामान डिलिव्हर करण्याची जी जिओमार्ट एक्स्प्रेस सेवा होती ती थांबविण्यात आली आहे. 

सुत्रांनुसार युजर जियोमार्ट एक्सप्रेस अ‍ॅपला गूगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकत नाहीएत. ही सेवा बंद करण्यात आली आहे. वेबसाइट देखील इनअ‍ॅक्टिव्ह झाली आहे. ग्राहकांना व्हॉट्सअ‍ॅपवर जिओमार्ट वापरण्यास सांगितले जात आहे. तिथून ऑर्डर केली की त्याच्या डिलिव्हरीसाठी अनेक तास किंवा दुसरा दिवस उजाडत आहे. 

रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्मने व्हॉट्सअ‍ॅपची मूळ कंपनी मेटा इंकसोबत भागीदारी केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे JioMart वर ऑर्डर करणे हा त्याचाच एक भाग आहे. रिलायन्सने गेल्या वर्षी मार्चमध्ये नवी मुंबईत JioMart एक्सप्रेस लाँच केले होते. ही सेवा २०० शहरांत विस्तारित केली जाणार होती. 

एका सूत्राने सांगितले की, JioMart या प्रकारच्या व्यवसायात येऊ इच्छित नाही. त्यासाठी खूप रोख खर्ची पडत आहे. गेल्या वर्षी ९० मिनिटांच्या डिलिव्हरीला चांगला प्रतिसाद मिळत होता, यामुळे रिलायन्सनेही त्यात उडी मारली होती. परंतू, आता त्यांना ही बाब खर्चिक असल्याचे समजले आहे. 

ईशा अंबानीच्या नेतृत्वाखालील रिलायन्स रिटेलच्या प्रवक्त्याने याची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की JioMart एक्सप्रेस हा एक पायलट प्रकल्प होता जो निवडक युजरसाठी सुरु केला होता. किराणा मालातील कंपनीचा डिजिटल कॉमर्स व्यवसाय विविध स्वरूपात सुरू राहील. JioMart सध्या 350 हून अधिक शहरांमध्ये आहे.  

टॅग्स :मुकेश अंबानीरिलायन्स