शेअर बाजारात सोमवारी अर्थात आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी, टाटा समूहाची कंपनी असलेल्या टायटनच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी दिसून आली. मात्र ही तेजी काही काळासाठीच कायम रहिली आणि नंतर कंपनीचा शेअर पुन्हा खाली जाणे सुरू झाले. पण, या तेजीच्या काळात केवळ काही सेकंदांतच, दिवंगत गुंतवणूकदारराकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांनी 400 कोटी रुपयांहूनही अधिक रुपये छापले.
सुरुवातीच्या व्यवहारात 2% ची उसळी -
खरे तर, मार्केट अॅनालिस्ट्स दुसऱ्या तिमाहीतील विक्रीत वाढीनंतर, स्टॉकमध्ये दिलासादायक तेजीची शक्यता वर्तवत आहेत. या मागचे कारण, टायटन कंपनी लिमिटेडचे सप्टेंबर तिमाहीचे चांगले अपडेट मानले जाऊ शकते. यामुळे कंपनीच्या शेअरने सुरुवातीच्या व्यवहारात 2 टक्यांहून अधिकची उसळी घेतली.
रेखा झुनझुनवाला यांची टाइटन मध्ये 5.32% हिस्सेदारी -
बाजारातील सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान टायटनच्या शेअरमध्ये दिसून आलेल्या उसळीचा परिणाम थेट गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांच्या संपत्तीवरही दिसून आला. सोमवारी सकाळच्या सुमारास शेअर बाजार सुरू झाल्यानंतर, टायटन स्टॉक उसळीसह 3748 रुपयांच्या इंट्रा-डे हायवर पोहोचला. मात्र, काही सेकंदांसाठी आलेल्या या तेजीत रेखा झुनझुनवाला यांच्या हिस्सेदारीत 409 कोटी रुपयांची तेजी दिसून आली.
या ज्वैलरी कंपनीच्या शेअर्समध्ये झुनझुनवाला यांचा वाटा 5.32 टक्के एवढा आहे. शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, त्यांच्याजवळ टायटनचे 4.65 कोटीहून अधिक शेअर आहेत. यांचे मूल्य शुक्रवारी 17301 कोटी रुपये एवढे होते. सोमवार सकाळी ही वाढून 17710 कोटी रुपयांवर पोहोचली.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)