Lokmat Money > बिझनेस न्यूज > सरकारच्या 'या' योजनेत दररोज फक्त 2 रुपये जमा केल्यास मिळेल 36000 रुपयांची पेन्शन 

सरकारच्या 'या' योजनेत दररोज फक्त 2 रुपये जमा केल्यास मिळेल 36000 रुपयांची पेन्शन 

PM Shram Yogi Mandhan Yojana : या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांचा वृद्धापकाळ सुरक्षित करण्यासाठी मदत केली जाईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 12:55 PM2021-11-24T12:55:54+5:302021-11-24T12:58:08+5:30

PM Shram Yogi Mandhan Yojana : या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांचा वृद्धापकाळ सुरक्षित करण्यासाठी मदत केली जाईल.

Earn Money 36000 Rupees By Saving Just 2 Rupees In PM Shram Yogi Mandhan Yojana | सरकारच्या 'या' योजनेत दररोज फक्त 2 रुपये जमा केल्यास मिळेल 36000 रुपयांची पेन्शन 

सरकारच्या 'या' योजनेत दररोज फक्त 2 रुपये जमा केल्यास मिळेल 36000 रुपयांची पेन्शन 

नवी दिल्ली : केंद्र सरकार असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी अनेक योजना राबवत आहे, त्यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (PM Shram Yogi Mandhan Yojana) आहे. या योजनेंतर्गत रस्त्यावरील विक्रेते, रिक्षाचालक, बांधकाम कामगार आणि असंघटित क्षेत्राशी संबंधित लोकांना त्यांचा वृद्धापकाळ सुरक्षित करण्यासाठी मदत केली जाईल.

या योजनेंतर्गत सरकार कामगारांना पेन्शनची हमी देते. या योजनेत तुम्ही दररोज फक्त 2 रुपये जमा करून वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल...

दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील
ही योजना सुरू केल्यावर, तुम्हाला दरमहा 55 रुपये जमा करावे लागतील, म्हणजेच दररोज 2 रुपयांपेक्षा कमी.  या योजनेत तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी दररोज जवळपास 2 रुपये जमा केल्यास तुम्हाला वार्षिक 36000 रुपये पेन्शन मिळू शकते. 

जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 40 व्या वर्षापासून ही योजना सुरू केली तर त्याला दरमहा 200 रुपये जमा करावे लागतील. तुम्हाला वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन मिळू लागेल. 60 वर्षांनंतर तुम्हाला दरमहा 3000 रुपये म्हणजेच वर्षाला 36000 रुपये पेन्शन मिळेल.

या डॉक्युमेंट्सची गरज
या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बचत बँक खाते आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे. व्यक्तीचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 40 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

असे करावे लागेल रजिस्ट्रेशन
या योजनेसाठी तुम्हाला कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मध्ये रजिस्ट्रेशन करावे लागेल. कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये कामगार पोर्टलवर स्वतःचे रजिस्ट्रेशन करू शकतात. सरकारने या योजनेसाठी वेब पोर्टल तयार केले आहे. या केंद्रांद्वारे ऑनलाइन सर्व माहिती भारत सरकारकडे जाईल.

द्यावी लागेल ही माहिती
रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड, बचत किंवा जन धन बँक खाते पासबुक, मोबाइल नंबर आवश्यक असणार आहे. याशिवाय, संमतीपत्र द्यावे लागेल जे कामगाराचे बँक खाते असलेल्या बँकेच्या शाखेत देखील द्यावे लागेल, जेणेकरून त्याच्या बँक खात्यातून पेन्शनसाठी वेळेत पैसे कापता येतील.

Read in English

Web Title: Earn Money 36000 Rupees By Saving Just 2 Rupees In PM Shram Yogi Mandhan Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.