नवी दिल्ली : जर तुम्हीही व्यवसाय करण्याची योजना आखत असाल तर आता तुम्ही भारतीय रेल्वेसोबत (Business with indian railways) मिळून पैसे कमवू शकता. तुम्ही कमी भांडवलात सुद्धा बम्पर नफ्यासह व्यवसाय सुरू करू शकता. दरम्यान, आत्मनिर्भर भारत (aatma nirbhar bharat) अभियानांतर्गत भारतीय रेल्वेने (Indian Railway) सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना (MSME) आपला भागीदार होण्याची संधी दिली आहे. तर तुम्हालाही भागीदार व्हायचं असेल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. यात तुम्ही रेल्वेसोबत मिळून चांगली कमाई करू शकता. (earn money with indian railways start new business and get good profit with railways)
रेल्वेला प्रोडक्ट विकून करा कमाई
रेल्वेकडून दरवर्षी 70,000 कोटी रुपयांहून अधिक किंमतीची प्रोडक्ट्स खरेदी केली जातात. यामध्ये टेक्निकल आणि इंजिनिअरिंग प्रोडक्ट्ससह रोजच्या वापरासाठी लागणारे विविध प्रोडक्ट्सचा समावेश आहे.
व्यवसायासाठी करू शकता रजिस्ट्रेशन
जर तुम्ही रेल्वेसोबत व्यवसाय करु इच्छित असल्यास https://ireps.gov.in आणि https://gem.gov.in या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करु शकता.
असा सुरु करू शकता व्यवसाय
- बाजारात स्वस्त वस्तूंचा पुरवठा करणार्या कंपनीकडून रेल्वेकडून प्रोडक्ट्स खरेदी करण्यात येते. तर अशा परिस्थितीत तुम्हाला असे एखादे प्रोडक्ट निवडावे लागेल, जे तुम्ही कोणत्याही कंपनीकडून स्वस्त खरेदी करू शकता.
- यानंतर तुम्हाला एक डिजिटल सिग्नेचर (digital signature) तयार करावी लागेल. या मदतीने तुम्ही रेल्वेच्या https://ireps.gov.in आणि https://gem.gov.in या वेबसाइटवर जाऊन नवीन टेंडर पाहू शकता.
- टेंडर अपलोड करतेवेळी तुमचे भांडवल आणि नफा लक्षात ठेवा. त्याच आधारे टेंडर भरा.
- याशिवाय, हे लक्षात ठेवा की जर तुमचे दर स्पर्धात्मक (competitive rates) असतील तर टेंडर मिळवणे तुमच्यासाठी सोपे जाईल. सेवेच्या पुरवठ्यासाठी रेल्वेने काही तांत्रिक पात्रतेची मागणी केली आहे.
दरम्यान, एमएसएमईला प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे एक मोठा निर्णय घेत आहे. रेल्वेच्या कोणत्याही टेंडरच्या खर्चाच्या 25 टक्क्यांपर्यंत खरेदीत एमएसएमईला 25 टक्क्यांपर्यंत प्राधान्य मिळेल. तसेच, छोट्या उद्योगांना वारसा ठेव रक्कम आणि सुरक्षा ठेव रक्कम जमा करण्याच्या अटींमधूनही सूट देण्यात आली आहे.
दुसऱ्यांदा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही
तुम्ही आधीच रजिस्ट्रेशन केली असेल किंवा तुम्ही रेल्वेच्या दुसर्या एजन्सीमध्ये प्रोडक्ट्स पुरवण्यासाठी रजिस्ट्रेशन केले असेल तर तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही. एकदा रजिस्ट्रेशन झाल्यावर तुम्ही रेल्वेसोबत व्यवसाय सुरू करू शकता.