नवी दिल्ली : जर तुम्ही पैसे कमवण्याची संधी पाहात असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. 7 जुलैला शेअर बाजारातून (Share Market) कमाई करण्यासाठी तुमच्याकडे दोन चांगल्या संधी आहेत. या आठवड्यात दोन नवे आयपीओ (Earn money from IPO) सबस्क्रिप्शनसाठी खुले होणार आहेत. त्याद्वारे तुम्ही चांगला नफा कमावू शकता. (earn money from ipo on 7 july 2021, invest 14078 rupees and get good retund)
या आठवड्यात क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी (Clean Science & Technology) आणि जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स (GR Infraprojects) या दोन कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात येणार आहेत. या आयपीओद्वारे मिळून 2500 कोटी रुपयांहून अधिक निधी जमा होण्याची अपेक्षा आहे.
क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी (Clean Science and Technology) आणि जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स (GRIL) या दोन्ही कंपन्यांचा आयपीओ 7 जुलैला खुला होणार आहे, तर 9 जुलैला बंद होणार आहे. अँकर गुंतवणुकदार शेअर्ससाठी 6 जुलैला बोली लावू शकतील. दोन्ही कंपन्या आयपीओच्या माध्यमातून एकूण 2510 कोटी रुपये उभे करणार आहेत. या कंपन्यांचे शेअर्स बीएसई आणि एनएसईमध्ये नोंदवले जाणार आहेत.
पेन्शनधारकांसाठी खूशखबर, पेन्शनच्या रकमेबाबत सरकारने घेतला 'हा' निर्णय! https://t.co/Xb6hDZ8y6j#pensiones#7thpaycommission
— Lokmat (@MiLOKMAT) July 4, 2021
क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजीची प्राइस बँड
क्लीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी या कंपनीच्या आयपीओसाठी प्राइस बँड 880 ते 900 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. कंपनीचे 1546.62 कोटी रुपयांचे आयपीओ विद्यमान प्रमोटर्स आणि शेअरधारकांकडून विक्री (OFS, Offer for sale) च्या स्वरूपात असणार आहे.
जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्सची प्राइस बँड
जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स (GR Infraprojects) या कंपनीच्या आयपीओसाठी प्राइस बँड 828 ते 837 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. या आयपीओमध्ये ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून पाच रुपये दर्शनी मूल्य (Face Value) असलेले 1.15 कोटी इक्विटी शेअर्स (Equity Shares) उपलब्ध केले जाणार आहेत. हे इक्विटी शेअर्स कंपनीचे प्रमोटर्स आणि विद्यमान गुंतवणूकदार विक्रीच्या माध्यमातून उपलब्ध करतील.याचबरोबर, जीआर इन्फ्राप्रोजेक्ट्स कंपनीने आयपीओमध्ये 17 शेअर्सचा एक लॉट ठेवला आहे. कमीत कमी एक लॉट (Share Lot) खरेदी करावा लागेल. म्हणजेच 837 रुपये किंमत ठरली, तर कमीत कमी 14,076 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल.