नवी दिल्ली : देशभरात वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने प्लास्टिकवरही बंदी घातली आहे. अशा परिस्थितीत तुम्ही पेपर कपचा व्यवसाय सुरू करू शकता. दरम्यान, सध्या पेपर कप व्यवसायाला बरीच मागणी आहे. या व्यतिरिक्त या व्यवसायात तुम्ही कमी पैशात अधिक नफा कमवू शकता.(earn money with paper cup business and get big profit know about the plan)
विशेष म्हणजे सरकार मुद्रा योजनेंतर्गत पेपर कप मॅन्युफॅक्चरिंग युनिट निर्मितीसाठी मदत करत आहे. यासाठी केंद्र सरकारकडून प्रोजेक्ट रिपोर्ट सुद्धा तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये व्यवसाय सुरू करण्यासाठी येणाऱ्या खर्चापासून ते मिळणाऱ्या नफ्याची संपूर्ण माहिती आहे.
हा व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे 500 चौरस फूट जागेची आवश्यकता असणार आहे. यंत्रसामग्री, उपकरणे, उपकरणे आणि फर्निचर, डाई, विद्युतीकरण, इंस्टालेशन व प्री-ऑपरेटिव्हसाठी खर्च - 10.70 लाख रुपये येईल.
कामगांराना दिला जाणारा पगार - जर तुम्ही स्किल्ड आणि अनस्किल्ड असे दोन्हीही कामगार ठेवले तर यासाठी तुम्हाला दरमहा जवळपास 35000 रुपये खर्च येईल.
रॉ मटेरिअल खर्च : 3.75 लाख रुपये
युटिलिटीजवर खर्च : 6000 रुपये
अन्य खर्च : 20,500 रुपये
किती कमवू शकता नफा?
जर तुम्ही हा व्यवसाय सुरू केला आणि वर्षामध्ये 300 दिवस काम केले तर तुम्हाला जवळपास 300 दिवसांत 2.20 कोटी युनिट पेपर कप तयार करू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही प्रति कप किंवा ग्लास सुमारे 30 पैसे दराने विकू शकता.
सरकार करेल मदत
केंद्र सरकारच्या मुद्रा कर्जामधून या व्यवसायात मदत देखील उपलब्ध आहे. म्हणजेच तुम्ही कर्ज घेतही हा व्यवसाय सुरू करू शकता. मुद्रा कर्ज अंतर्गत सरकार व्याजावर अनुदान देते. या योजनेंतर्गत तुम्हाला एकूण प्रोजेक्ट खर्चाच्या 25 टक्के गुंतवणूक स्वत: वर करावी लागेल. मुद्रा योजनेंतर्गत सरकार 75 टक्के कर्ज देईल.
कुठे मिळते मशीन?
दिल्ली, हैदराबाद, आग्रा आणि अहमदाबाद यासह अनेक शहरांमध्ये पेपर कप बनविणारी मशीन्स उपलब्ध आहेत. अशा मशीन्स तयार करण्याचे काम अभियांत्रिकी काम करणार्या कंपन्या करतात.