Join us

PM जनधन योजनेसोबत मिळून करा कमाई, सरकार दरमहा पाठवेल पैसे; जाणून घ्या, सविस्तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 1:08 PM

pradhan mantri jan dhan yojana : योजनेअंतर्गत तुम्हाला 5000 रुपयांचा निश्चित पगार (Fixed Salary) मिळेल. तसेच, व्यवहारानुसार तुम्हाला कमिशन सुद्धा मिळेल.

नवी दिल्ली : जर तुम्ही कमाई करण्यासाठी एखादी संधी पाहत असाल तर, आता बँकेसोबत मिळून तुम्ही चांगला फायदा करून घेऊ शकता. केंद्र सरकार तुम्हाला पंतप्रधान जनधन योजनेसोबत (Pradhan Mantri Jan Dhan yojana) मिळून कमाईची संधी उपलब्ध करून देत आहे. तुम्ही बँक मित्र (Bank Mitra) बनून चांगली कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही ठराविक शिक्षणाची किंवा ट्रेनिंगची आवश्यकता नाही. (earn money with pradhan mantri jan dhan yojana became bank mitra know about it here)

दरम्यान, या योजनेअंतर्गत तुम्हाला 5000 रुपयांचा निश्चित पगार (Fixed Salary) मिळेल. तसेच, व्यवहारानुसार तुम्हाला कमिशन सुद्धा मिळेल. याशिवाय, बँक मित्रसाठी सरकारकडून एक लोन स्कीम देखील तयार करण्यात आली आहे, ज्याअंतर्गत तुम्हाला कम्प्यूटर आणि वाहन इ. साठी कर्ज सुद्धा देण्यात येईल.

कोण आहेत बँक मित्र?पंतप्रधान जन-धन योजनेअंतर्गत (PMJDY) बँक मित्रांना लोकांपर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ज्याठिकाणी बँक शाखा कमी आहेत किंवा एटीएम कमी आहेत त्याठिकाणी सरकारने बँक मित्र नियुक्त केले आहेत, ज्यामुळे तुम्हाला घरबसल्या सहज बँकिंग सेवा मिळू शकेल.

पगारासह मिळतील अनेक फायदे!या लोकांना सरकारकडून पगारासोबत कमिशन देखील देण्यात येते. बँक मित्रांचा निश्चित पगार 5000 रुपये आहे. त्यांनी एखाद्या व्यक्तीचे खाते उघडले किंवा एखाद्या व्यवहार केला तर त्यांना याकरता कमिशन देण्यात येते, जे आधीपासून ठरलेले असते.  बँक मित्रांना कम्प्यूटर आणि वाहन इ. साठी 1.25 लाखांची कर्ज सुविधा देण्यात येईल. तुम्हाला 50 हजार उपकरणासाठी कर्ज, 25 हजार कार्यरत भांडवल आणि 50 हजार वाहन कर्ज मिळेल. यासाठी बँक मित्राला 35 महिने ते 60 महिन्यांपर्यंत कर्ज मिळेल.

कोण करू शकतं अर्ज?>>18-60 वयोगटातील लोक बँक मित्र बनू शकतात.>> रिटायर्ड बँक कर्मचारी, शिक्षक, बँकेतील व्यक्ती याकरता अर्ज करू शकतात.>> केमिस्ट शॉप, किराणा शॉप, पेट्रोल पंप, बचत गट, PCO, कॉमन सर्विस सेंटर देखील बँक मित्र बनू शकतात.

बँक मित्राचं काम काय असतं?बँक मित्राचं काम बचत आणि कर्जाची माहिती, अर्ज आणि खात्यांशी संबंधित फॉर्म भरणे, वेळेवर पैसे भरणे आणि रक्कम जमा करणे, पैसे योग्य हातात पोहोचवणे, पावती देणे, खाती आणि इतर सुविधांबद्दल ग्राहकांना माहिती देणे आहे.

टॅग्स :व्यवसायपैसा