नवी दिल्ली - जुनी नाणी, नोटा जपून ठेवायची अनेकांना आवड असते. विविध प्रकारचे कॉईन्स आणि नोटा जमवण्याचा अनेकांना छंद असतो. सध्या पैशाचे व्यवहार करतान नोटा या हमखास वापरल्या जातात. नाणी जास्त वापरली जात नाहीत. मात्र आता अवघ्या एक रुपयाचं नाणं तुम्हाला मोठी रक्कम मिळवून देणार आहे. 1 रुपयांचे नाणे विकून तुम्ही लाखो रुपये कमवण्याची सुवर्णसंधी आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, इंडियामार्टच्या वेबसाईटवर जुन्या नाणी आणि नोटांचा लिलाव केला जात आहेत. जर तुम्हाला जुन्या वस्तू गोळा करण्याचा छंद असेल तर यातूनच तुम्ही लखपती होऊ शकता. मात्र यासाठी तुमच्याकडे 19 व्या शतकातील 1 रुपयाची चांदीची नाणी असायला हवी. 1916 मधील हे 1 रुपयाचं नाणं खूप खास आहे. इंडियामार्टच्या वेबसाईटनुसार, त्याची किंमत 5 लाख रुपये आहे.
कुठे आणि कसं विकायचं नाणं?
घरबसल्या इंडियामार्टच्या https://dir.indiamart.com/impcat/old coins.html या वेबसाईटवर जुन्या नोटा चांगल्या किंमतीला विकल्या जाऊ शकतात. यातून लाखो रुपये मिळवण्याची संधी आहे. इंडियामार्टच्या वेबसाईटवर तुम्ही जुनी नाणी देखील चांगल्या किंमतीत विकू शकता. या वेबसाईटवर, सर्व प्रकारच्या नाण्यांच्या किंमती कळतील. फ्लाइंग हेअर सिल्व्हर डॉलर अमेरिकेचे ऐतिहासिक नाणं आहे. असे सांगितलं जात आहे की, फ्लाइंग हेअर सिल्व्हर नाणं 1794 मध्ये बनवलेल्या 1958 चांदीच्या पैशांपैकी एक मानलं जातं. तसेच हे नाणे सर्वात महाग नाणं असल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
गुड न्यूज! तुम्ही 'ही' पॉलिसी घेतली असेल तर होईल फायदा; जाणून घ्या कसा? https://t.co/MJOrzRQeyd#money
— Lokmat (@MiLOKMAT) March 19, 2021
मोठा दिलासा! सरकारच्या 'या' निर्णयामुळे खिशावरचा वाढणार नाही भार, पैशांची बचत होणार
सरकारने आरोग्य विमा पॉलिसी घेणाऱ्या पॉलिसीधारकांना मोठा दिलासा दिला आहे. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) आरोग्य विमा प्रदात्यांना पॉलिसीधारकांच्या आरोग्य विमा पॉलिसींमध्ये (health policies) कोणतेही बदल करू नये, अशा सूचना दिल्यात. IRDAI चे हे निर्देश आरोग्य विमा तसेच वैयक्तिक अपघात विमा आणि ट्रॅव्हल विम्यास लागू असणार आहेत.
रोजगाराच्या शोधात असणाऱ्यांसाठी खूशखबर, मोदी सरकारच्या योजनेचा होणार मोठा फायदाhttps://t.co/CPInvQuscA#Jobs#ModiGovt#agriculture
— Lokmat (@MiLOKMAT) March 17, 2021
एका परिपत्रकात भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (IRDAI) दिलेल्या माहितीनुसार, सर्वसाधारण आणि स्वतंत्र आरोग्य विमाधारकांना विद्यमान पॉलिसीमध्ये असे फायदे जोडण्याची किंवा पॉलिसीमध्ये बदल करण्याची परवानगी नाही, ज्यामुळे प्रीमियममध्ये वाढ होते. गेल्या वर्षी जुलैमध्ये जाहीर झालेल्या आरोग्य विमा व्यवसायातील उत्पादन प्रस्तावित करण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचनांनुसार विमा कंपन्यांना किरकोळ बदल करण्याची परवानगी असल्याचं देखील म्हटलं आहे.
JOB Alert : HPCL मध्ये 'या' पदांसाठी आहे भरती, "ही" आहे अर्ज करण्याची अंतिम तारीखhttps://t.co/yeJZTt0fr3#HPCL#job#Engineers#Jobs#India
— Lokmat (@MiLOKMAT) March 18, 2021