Lokmat Money > बिझनेस न्यूज > FD द्वारे कमाई करत असाल तर जाणून घ्या 'हे' नियम, असा कमी होऊ शकतो नफा

FD द्वारे कमाई करत असाल तर जाणून घ्या 'हे' नियम, असा कमी होऊ शकतो नफा

मुदत ठेवींकडे सर्वसाधारणपणे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. पण, तुम्हाला माहिती आहे का? तुमचा हा नफा कर कपातीनंतर कमी होऊ शकतो. याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 03:57 PM2023-05-26T15:57:30+5:302023-05-26T15:58:27+5:30

मुदत ठेवींकडे सर्वसाधारणपणे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. पण, तुम्हाला माहिती आहे का? तुमचा हा नफा कर कपातीनंतर कमी होऊ शकतो. याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

earning from fixed deposit can be affected after tax deduction know this tds rule | FD द्वारे कमाई करत असाल तर जाणून घ्या 'हे' नियम, असा कमी होऊ शकतो नफा

FD द्वारे कमाई करत असाल तर जाणून घ्या 'हे' नियम, असा कमी होऊ शकतो नफा

तुम्हीही मुदत ठेवींमधून (fixed deposit) कमाई करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी धक्कादायक ठरेल. मुदत ठेवींमधून मिळणारी कमाई आता कमी होऊ शकते. मुदत ठेवींकडे सर्वसाधारणपणे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. पण, तुम्हाला माहिती आहे का? तुमचा हा नफा कर कपातीनंतर कमी होऊ शकतो. याबद्दल सविस्तर जाणून घ्या...

समजा तुम्हाला मुदत ठेवींवर 7 किंवा 8 टक्के परतावा मिळत आहे. त्यामुळे आता टीडीएसचा नवा नियम आल्यानंतर तुमचा परतावा कमी होणार आहे. SAG Infotech चे एमडी अमित गुप्ता यांच्या मते, मुदत ठेवीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर म्हणजेच तुमच्या परताव्यावर  10 टक्के TDS म्हणजेच कर कपात सेवा शुल्क आकारले जाईल. ही कर कपात व्यक्तीच्या एकूण उत्पन्न आणि कर स्लॅबनुसार केली जाईल. 

दुसरीकडे, जे जास्त कर स्लॅबमध्ये आहेत, ते आयकर भरताना या कर कपातीचा दावा करू शकत नाहीत. फंड्स इंडियाच्या मेच्या अहवालानुसार, SBI, PNB, HDFC आणि ICICI बँका 6 महिन्यांच्या ठेवींवर सरासरी 5 टक्के व्याज दर देत आहेत. त्याचवेळी, कर कपात केल्यानंतर, तो 3.49 टक्के होत आहे. त्याचप्रमाणे 5 वर्षांच्या ठेवीवर 6.75 टक्के व्याज मिळत होते. जे आता कर कपातीनंतर 4.9 टक्के झाले आहे.

FD मध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर का आहे?
फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणे नेहमीच फायदेशीर मानले जाते. कारण त्यावर बँक किंवा शेअर बाजार बुडण्याचा कोणताही परिणाम होत नाही. यामध्ये तुमचे पैसे मर्यादित काळासाठी सुरक्षित राहतात. त्याचबरोबर गरज पडल्यास तुम्ही हे पैसेही काढू शकता.

Web Title: earning from fixed deposit can be affected after tax deduction know this tds rule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.