Elon Musk: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट एक्स (पूर्वीचे ट्विटर) ताब्यात घेतल्यापासून, त्यात अनेक बदल केले आहेत. अलीकडेच मस्क यांनी ट्विटरचे नाव बदलून एक्स केले आहे. यानंतर आता त्यांनी पत्रकारांसाठी एक खास योजना आणली आहे. मस्क यांनी एक्सच्या माध्यमातून पत्रकारांना पैसे देण्याची योजना आखली आहे.
If you’re a journalist who wants more freedom to write and a higher income, then publish directly on this platform!
— Elon Musk (@elonmusk) August 21, 2023
इलॉन मस्क यांनी पत्रकारांना थेट X (ट्विटर) वर बातम्या प्रकाशित करण्याचे आवाहन केले आहे. मस्क यांनी ट्विट केले की, 'तुम्ही पत्रकार असाल, तुम्हाला लिहिण्याचे अधिक स्वातंत्र्य आणि अधिक उत्पन्न हवे असेल, तर थेट या प्लॅटफॉर्मवर बातम्या प्रकाशित करा.' विशेष म्हणजे, यापूर्वीही मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट X (ट्विटर) मध्ये मीडिया पब्लिशर्ससाठी पेमेंटबाबत भाष्य केले होते.
युजर्सकडून पैसे आकारले जातील
त्यांनी म्हटले होते की, युजर्सकडून "प्रति लेख आधारावर" शुल्क आकारले जाईल. जर त्यांनी मासिक सदस्यतेसाठी साइन अप केले नाही, तर त्यांना अधिक पैसे मोजावे लागतील. यासोबतच या व्यासपीठावर लिहिणाऱ्या पत्रकारांना मोबदलाही दिला जाईल. पत्रकारांना दिलेल्या या विशेष ऑफरबाबत मस्क यांनी अद्याप संपूर्ण माहिती दिलेली नाही. एक्सच्या या निर्णयाचा पत्रकारांना चांगलाच फायदा होणार असल्याचे मानले जात आहे.