केंद्र सरकार देशातील मुलींसाठी अनेक योजना राबवत आहे. ज्या अंतर्गत गरीब आणि गरजूंना आर्थिक मदत केली जाते. सध्या सरकारी योजनांच्या खोट्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुलीं संदर्भातील एका योजनेची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.यात सर्व मुलींना सरकारकडून दरमहा 2,100 रुपये मिळत असल्याचे सांगितले आहे.
एका युट्युब चॅनेवरुन फेक माहिती व्हायरल केली जात आहे. भारत सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडल पीआयबी फॅक्ट चेकने ट्विट करून या बातमीची सत्यता सांगितली आहे. पीआयबीने आपल्या ट्विटरद्वारे याबाबत इशारा दिला आहे. 'सरकार अशी कोणतीही योजना चालवत नाही आणि हा संदेश पूर्णपणे खोटा आहे. मुलींना दरमहा 2,100 रुपये देण्याचा दावा खोटा असल्याचे पीआयबीने सांगितले आहे.
यापूर्वीही अनेक फेक न्यूज व्हायरल झाल्या आहेत. सोशल मीडियावर अनेकजण सरकारच्या योजनांची चुकीची माहिती व्हायरल करत असते. या चॅनलचे बहुतांश व्हिडिओ खोटे दावे करत आहेत. यापूर्वी, असं दावे करण्यात आले आहेत.