Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘लॉकइन’मुळे कमाईची संधी; बाजारातील २७ आयपीओचा लॉकइन पीरिएड दोन महिन्यांत संपुष्टात

‘लॉकइन’मुळे कमाईची संधी; बाजारातील २७ आयपीओचा लॉकइन पीरिएड दोन महिन्यांत संपुष्टात

४ कंपन्या वगळता सर्व २३ कंपन्यांनी गुंतवणूकदारांना जोरदार फायदा मिळवून दिला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 01:25 PM2023-08-21T13:25:16+5:302023-08-21T13:36:55+5:30

४ कंपन्या वगळता सर्व २३ कंपन्यांनी गुंतवणूकदारांना जोरदार फायदा मिळवून दिला आहे

Earning opportunity due to 'lockin' | ‘लॉकइन’मुळे कमाईची संधी; बाजारातील २७ आयपीओचा लॉकइन पीरिएड दोन महिन्यांत संपुष्टात

‘लॉकइन’मुळे कमाईची संधी; बाजारातील २७ आयपीओचा लॉकइन पीरिएड दोन महिन्यांत संपुष्टात

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२२ या कालखंडात शेअर बाजारात लिस्ट झालेल्या २७ आघाडीच्या कंपन्यांच्या समभागांवरील लॉक इन पीरिएड येत्या दोन महिन्यात संपुष्टात येत आहे. हा अवधी संपुष्टात येत असल्याने काही कंपन्यांचे प्रमोटर, अँकर गुंतवणूकदार आणि शेअर होल्डर आपल्याकडील समभागांची विक्री करून नफा कमावण्याची शक्यता आहे. यामुळे या समभागांचे मूल्य ढासळू शकते. काही शेअर होल्डर्स आपला तोटा भरून काढण्यासाठी समभागांची विक्री करण्याचा विचार करू शकतात. विशेष म्हणजे ज्या २७ कंपन्यांचा लॉक इन पीरिएड संपुष्टात येत आहे त्यातील ४ कंपन्या वगळता सर्व २३ कंपन्यांनी गुंतवणूकदारांना जोरदार फायदा मिळवून दिला आहे. त्यामुळे या कंपन्यांवर गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष आहे.

बाजार अनुकूल

  • सध्या स्मॉल कॅप आणि मिड कॅप समभागांमध्ये जास्त दुरुस्ती दिसून येत नाहीत. बाजार अजूनही आयपीओसाठी अनुकूल आहे. 
  • ज्याचे समभाग आयपीओ किमतीच्या तुलनेत खूप वर चढले त्यात गुंतवणूक केलेल्यांना मोठा नफा कमावता येऊ शकतो. 
  • एलआयसी, उदयशिवाकुमार इन्फ्रा आणि उमा एक्सपोटर्स मात्र इश्यू प्राइसच्या तुलनेत खूपच खालच्या पातळीवर उतरले आहेत.


यंदा जोरदार उसळी

  • कंपनी           वृद्धी 
  • पेटीएम         +६१% 
  • पॉलिसीबाजार          +६०% 
  • झोमॅटो          +४८% 
  • डेल्हिवरी          +२६% 
  • नायका         -१५%
  • निफ्टी ५००          +०९%


किती काळाचा हा कालावधी?

- प्रमोटर्स

  • ८०% शेअर्स - ६ महिने 
  • २०% शेअर्स  - १८ महिने 
  • अँकर गुंतवणूकदार ५०% शेअर्स  - ३० दिवस 
  • ५०% शेअर्स - ९० दिवस

लॉकइन पीरिएड संपणार असलेल्या प्रमुख कंपन्या

       कंपनी              रिटर्न     लॉक्ड शेअर्स

  • एलआयसी              ३०%       १२६.५ 

  • केनेस टेक               २००%       २.५ 

  • इलेक्ट्रॉनिक मार्ट     १२३%        २२.३ 

  • सिरमा एसजीएस     ११०%       १०.३ 

  • उत्कर्ष एसएफबी     ९६%       ८.९ 

  • मॅनकाईंट फार्मा      ७०%       २८.६ 

  • वेदांत फॅशन            ४४%       ४.९ 

  • कँपस शूज               ०१%       ६.१ 

  • फ्यूजन फायनान्स    ५५%       ५.१

(लॉकइन मधील समभागांची संख्या कोटींमध्ये)

Web Title: Earning opportunity due to 'lockin'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.