Lokmat Money > बिझनेस न्यूज > Wipro देणार कमाईची संधी, २२ जूनला खुला होणार शेअर बायबॅक; पाहा डिटेल

Wipro देणार कमाईची संधी, २२ जूनला खुला होणार शेअर बायबॅक; पाहा डिटेल

२२ जूनपासून शेअर बायबॅक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 04:12 PM2023-06-20T16:12:21+5:302023-06-20T16:12:41+5:30

२२ जूनपासून शेअर बायबॅक कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.

Earning opportunity for Wipro investors share buyback to open on June 22 See details 12000 crores biggest of company azim premji | Wipro देणार कमाईची संधी, २२ जूनला खुला होणार शेअर बायबॅक; पाहा डिटेल

Wipro देणार कमाईची संधी, २२ जूनला खुला होणार शेअर बायबॅक; पाहा डिटेल

बेंगळुरू येथील प्रमुख आयटी कंपनी विप्रोनं मंगळवारी 12,000 कोटी रुपयांचा शेअर बायबॅक कार्यक्रम जाहीर केला. कंपनीच्या इतिहासातील हा सर्वात मोठा बायबॅक कार्यक्रम आहे. हा 22 जून रोजी खुला होणार असून 29 जून रोजी बंद होईल.

विप्रोने जारी केलेल्या ऑफर फॉर लेटमध्ये रिटेल इनटायटलमेंट रेश्यो 23.4 टक्के निश्चित केल्याचं म्हटलंय. तर इतरांसाठी तो 4.3 टक्के निश्चित करण्यात आला असल्याचे सांगण्यात आलेय. निफ्टीमध्ये समाविष्ट असलेली कंपनी 26.97 कोटी शेअर्स 445 रुपयांच्या शेअर्सच्या किमतीसह खरेदी करेल. अशाप्रकारे, कंपनी विप्रोच्या शेअर्सच्या सोमवारच्या क्लोजिंग लेव्हलच्या 17 टक्के प्रीमिअम सोबत कंपनी शेअर खरेदी करणार आहे.

किती शेअर्ससाठी करता येणार अर्ज
कंपनीचे २ लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीचे शेअर्स असलेल्यांना रिटेल शेअरहोल्डर्स म्हटलं गेलंय. कंपनीचे छोटे शेअर होल्डर्ल 16 जूनच्या रेकॉर्ड डेटवर 265 शेअरहोल्डिंगवर 62 शेअर्ससाठी अर्ज करू शकतात. सामान्य श्रेणीमध्ये 603 शेअर्सवर 26 शेअर्स निश्चित करण्यात आलेत. जर 100 टक्के बायबॅक झालं तर कंपनीतील प्रवर्तकांचा हिस्सा 72.91 टक्क्यांवरून 73.37 टक्क्यांपर्यंत वाढेल.

कंपनीला होणार फायदा
बायबॅकमुळे शेअर ऑन शेअर (EPS) आणि रिटर्न ऑन इक्विटी यासारख्या फायनॅन्शिअल रेशोंना सुधारण्यात मदत होते. कंपनीनं केलेल्या गणनेनुसार बायबॅकनंतर कंपनीचा ईपीएस 20.73 टक्क्यांवरून 21.79 पर्यंत वाढेल. तर, टीटीएम पीई 17.75 वरून 16.89 वर येईल. कंपनीच्या प्रवर्तकांमध्ये अझीम प्रेमजी आणि रिषद प्रेमजी आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा समावेश आहे. कंपनीच्या प्रवर्तकांनीही बायबॅकमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केलीये.

Web Title: Earning opportunity for Wipro investors share buyback to open on June 22 See details 12000 crores biggest of company azim premji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.