Lokmat Money > बिझनेस न्यूज > दोन दिवसांत ३२% वाढली कमाई; प्रभू श्रीराम पावले; हॉटेल, रेल्वे, बुकिंग कंपन्याचे समभाग वधारले

दोन दिवसांत ३२% वाढली कमाई; प्रभू श्रीराम पावले; हॉटेल, रेल्वे, बुकिंग कंपन्याचे समभाग वधारले

म मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा लाभ झालेल्या या कंपन्या पुढीलप्रमाणे आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 02:33 PM2024-01-11T14:33:49+5:302024-01-11T14:35:59+5:30

म मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा लाभ झालेल्या या कंपन्या पुढीलप्रमाणे आहेत.

Earnings increased 32% in two days; Lord Sri Rama walked; Shares of hotel, railway, booking companies rose | दोन दिवसांत ३२% वाढली कमाई; प्रभू श्रीराम पावले; हॉटेल, रेल्वे, बुकिंग कंपन्याचे समभाग वधारले

दोन दिवसांत ३२% वाढली कमाई; प्रभू श्रीराम पावले; हॉटेल, रेल्वे, बुकिंग कंपन्याचे समभाग वधारले

लोकमत न्यूज नेटवर्क : नवी दिल्ली : अयोध्येत २२ जानेवारी रोजी राम मंदिराचे उद्घाटन होणार असून त्याचा हॉटेल, हवाई वाहतूक आणि रेल्वेशी संबंधित ६ कंपन्यांना मागील २ दिवसांत जबरदस्त फायदा झाला आहे. या कंपन्यांचे समभाग तेजीत आले आहेत. राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा लाभ झालेल्या या कंपन्या पुढीलप्रमाणे आहेत.

अपोलो सिंदुरी हॉटेल्स

चेन्नईच्या या कंपनीच्या समभागांत ३२ टक्के तेजी आली. मंगळवारी कंपनीचा समभाग १,९९८ रुपयांवर बंद झाला. ही कंपनी अयोध्येतील टेडी बाजारात अनेक मजल्यांचे ३ हजार चौरस मीटर पार्किंग बनवत आहे.

इंडियन हॉटेल्स

७३ हजार कोटींचे भांडवल असलेली कंपनी अयोध्येत विवांता आणि जिंजर या ब्रँडनेमखाली २ ग्रीनफिल्ड हॉटेलांची उभारणी करीत आहे. कंपनीच्या समभागांत २३ टक्के तेजी आली.

पर्यटन कंपनी पर्वेज

लक्झरी टेंट पुरवणारी कंपनी आहे. तिच्या समभागांत ४७ टक्के वृद्धी झाली. मंगळवारी कंपनीचा समभाग १,२१९.१० रुपयांवर बंद झाला. कंपनीने गेल्या वर्षी अयोध्येत ३० टेंटचे लक्झरी रिसॉर्ट सुरू केले. 

आयआरसीटीसी बुकिंग

या रेल्वेची ऑनलाईन बुकिंग कंपनीच्या समभागांत २३ टक्के तेजी आली. आगामी काही महिन्यांत लाखो लोक अयोध्येला येऊ शकतात. त्यामुळे कंपनीला लाभ झाला आहे.

जेनेसिस इंटरनॅशनल

ही मॅपिंग टेक्नोलॉजी सॉल्यूशन्स पुरवणारी कंपनी आहे. तिचा समभाग मंगळवारी ७ टक्के तेजीसह ४८७ रुपयांवर पोहोचला. कंपनीच्या ३ डी डिजिटल मॅप सेवेला अयोध्येसाठी निवडण्यात आले आहे.

विमान कंपनी इंडिगो

कंपनीने अयोध्या-दिल्ली दरम्यान थेट विमान सेवा सुरू केली आहे. अहमदाबाद-अयोध्या अशी विमान सेवाही सुरू केली आहे. त्यामुळे कंपनीचे समभाग तेजीत आहेत.

Web Title: Earnings increased 32% in two days; Lord Sri Rama walked; Shares of hotel, railway, booking companies rose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.