Lokmat Money > बिझनेस न्यूज > 14 ते 16 जूनपर्यंत बंपर कमाईची संधी, एकाच दिवसात व्हाल लखपती! जाणून घ्या, कुठे आणि कसा गुंतवायचा पैसा

14 ते 16 जूनपर्यंत बंपर कमाईची संधी, एकाच दिवसात व्हाल लखपती! जाणून घ्या, कुठे आणि कसा गुंतवायचा पैसा

आर्थिक वर्ष 2020-21 च्या डिसेंबर तिमाहीपर्यंत कंपनीचा एकूण महसूल 3933.08 कोटी रुपये होता. तर मागील वर्षी या कालावधीत कंपनीचा एकूण महसूल 3283.09 कोटी रुपये होता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 12:40 PM2021-06-06T12:40:27+5:302021-06-06T12:44:58+5:30

आर्थिक वर्ष 2020-21 च्या डिसेंबर तिमाहीपर्यंत कंपनीचा एकूण महसूल 3933.08 कोटी रुपये होता. तर मागील वर्षी या कालावधीत कंपनीचा एकूण महसूल 3283.09 कोटी रुपये होता. 

Earnings opportunity from June 14 to 16, shyam metalics ipo to open on 14 june know how to invest money and earn best profit | 14 ते 16 जूनपर्यंत बंपर कमाईची संधी, एकाच दिवसात व्हाल लखपती! जाणून घ्या, कुठे आणि कसा गुंतवायचा पैसा

14 ते 16 जूनपर्यंत बंपर कमाईची संधी, एकाच दिवसात व्हाल लखपती! जाणून घ्या, कुठे आणि कसा गुंतवायचा पैसा

Highlightsया आयपीओच्या माध्यमाने 1107 कोटी रुपये जमवण्याचा कंपनीचा उद्देश आहे...आपण 14 ते 16 तारखेपर्यंत यात पैसा लावू शकता.आर्थिक वर्ष 2020-21 च्या डिसेंबर तिमाहीपर्यंत कंपनीचा एकूण महसूल 3933.08 कोटी रुपये होता.

नवी दिल्ली - या महिन्यात 14 ते 16 जूनपर्यंत आपल्याकडे बक्कळ पैसा कमावण्याची संधी आहे. कोलकाता बेस्ड स्टिल मॅन्युफक्चरिंग कंपनी श्याम मेटालिक्स अँड एनर्जी लिमिटेड (Shyam Metalics and Energy Ltd) आपल्याला ही संधी देत आहे. ही कंपनी आपला आयपीओ घेऊन येत आहे. याच्या माध्यमातून आपण चांगली कमाई करू शकाल. तर जाणून घेऊया, आपण यात कशा प्रकारे गुंतवणूक करू शकतात. (Earnings opportunity from June 14 to 16, shyam metalics ipo to open on 14 june know how to invest money and earn best profit) 

या आयपीओच्या माध्यमाने 1107 कोटी रुपये जमवण्याचा कंपनीचा उद्देश आहे. हा IPO 14 जूनला लॉन्च होईल. आपण 14 ते 16 तारखेपर्यंत यात पैसा लावू शकता. तसेच, अँकर गुंतवणूकदारांसाठी 11 जूनला बोली खुली होईल.

कंपनी किती शेअर्स जारी करणार - 
मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तानुसार, मार्केट रेगुलेटर SEBI जवळ असलेल्या कंपनीच्या ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार (DRHP), या पब्लिक इश्यूसाठी कंपनी 657 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर्स जारी करेल. तर कंपनीचे प्रमोटर आणि सध्याचे गुंतवणूकदार ऑफर फॉर सेल (OFS)च्या माध्यमाने 450 कोटी रुपयांचे शेअर्स जारी करतील.

फंडचा वापर कुठे करणार -
- IPOच्या माध्यमाने जमवलेल्या 657 कोटी रुपयांचा वापर कंपनी आपल्या आणि सहकारी कंपनी SSPL वरील कर्ज फेडण्यासाठी करणार आहे.
-  या IPOसाठी Shyam Metalics ने ICICI Securities, अॅक्सिस कॅपिटल (Axis Capital), IIFL Securities, जेएम फायनांशिअल (JM Financial) आणि एसबीआय कॅपिटल (SBI Capital) ला आपले लीड मॅनेजर म्हणून नियुक्त केले आहे. 

कसा आहे कंपनीचा व्यवसाय -
कंपनीच्या व्यवसायाबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने 13 राज्ये आणि एका केंद्र शासित प्रदेशात 42 वितरकांची टीम तयार केली आहे. ओडिशामधील संबलपूर आणि पश्चिम बंगालमधील जमुरिया आणि मंगलपूर येथे यांचे एकूण तीन कारखाने आहेत.

कंपनीवर किती आहे कर्ज? -
कंपनीवर एकूण 381.12 कोटी रुपयांचे कर्ज आहे. तर हिच्या सहकारी कंपनीवर 398.60 कोटी रुपयांचे कर्ज होते. कंपनीवर एकूण 886.29 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

किती झालाय नफा -
- आर्थिक वर्ष 2020-21 च्या डिसेंबर तिमाहीपर्यंत कंपनीचा एकूण महसूल 3933.08 कोटी रुपये होता.
- मागील वर्षी या कालावधीत कंपनीचा एकूण महसूल 3283.09 कोटी रुपये होता. 
- Shyam Metalics ला डिसेंबर तिमाहीत 456.32 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता.
-  गेल्या आर्धिक वर्षात Q3 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा केवळ 260.36 कोटी रुपये होता.

Web Title: Earnings opportunity from June 14 to 16, shyam metalics ipo to open on 14 june know how to invest money and earn best profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.