Lokmat Money > बिझनेस न्यूज > टाटा सन्समध्ये भूकंप; हादरे शेअर बाजारात

टाटा सन्समध्ये भूकंप; हादरे शेअर बाजारात

टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून सायरस मिस्त्री यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आल्यामुळे, मंगळवारी शेअर बाजार हादरला. मुंबई शेअर बाजाराचा

By admin | Published: October 26, 2016 05:14 AM2016-10-26T05:14:11+5:302016-10-26T05:14:11+5:30

टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून सायरस मिस्त्री यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आल्यामुळे, मंगळवारी शेअर बाजार हादरला. मुंबई शेअर बाजाराचा

Earthquake in Tata Sons; Shares Stock Market | टाटा सन्समध्ये भूकंप; हादरे शेअर बाजारात

टाटा सन्समध्ये भूकंप; हादरे शेअर बाजारात

मुंबई : टाटा सन्सच्या चेअरमनपदावरून सायरस मिस्त्री यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आल्यामुळे, मंगळवारी
शेअर बाजार हादरला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सुमारे ८८ अंकांनी घसरला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ८,७00 अंकांच्या खाली आला.
काल बाजार संपल्यावर सायरस मिस्त्री यांच्या हकालपट्टीचे वृत्त आले होते. आज सकाळपासून बाजारात हा एकच मुद्दा केंद्रस्थानी राहिला. सेन्सेक्स ८७.६६ अंकांच्या अथवा 0.३१ टक्क्याच्या घसरणीसह २८,0९१.४२ अंकांवर बंद झाला. त्या आधीच्या दोन सत्रांत सेन्सेक्स १0१.९0 अंकांनी वाढला होता. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला निफ्टी १७.६५ अंकांनी अथवा 0.२0 टक्क्याने घसरून ८,६९१.३0 अंकांवर बंद झाला. (प्रतिनिधी)

पाच टक्के घसरण...
एनएसईमध्ये टाटा समूहातील टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा पॉवर आणि टीसीएस या कंपन्यांचे समभाग २.५१ टक्क्यांपर्यंत घसरले. बीएसईमध्येही कंपनीला मोठा फटका बसला. टाटा एक्सेल, टाटा कम्युनिकेशन्स, इंडियन हॉटेल्स, टाटा केमिकल्स, टायटन, टाटा मेटालिक्स या कंपन्यांचे समभाग १.१९ टक्का ते ४.९७ टक्के यादरम्यान घसरले.
आशियाई बाजारांत संमिश्र कल
सेन्सेक्समधील ३0 पैकी १७ कंपन्यांचे समभाग घसरले. घसरण सोसावी लागलेल्या बड्या कंपन्यांत एम अँड एम, गेल, एचयूएल, ओएनजीसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, आयटीसी यांचा समावेश आहे. व्यापक बाजारांत संमिश्र कल होता.
आशियाई बाजारांत संमिश्र कल पाहायला मिळाला. हाँगकाँगचा हँग सेंग 0.१७ टक्क्याने घसरला. जपानचा निक्केई मात्र, 0.७६ टक्क्याने वर चढला. चीनचा शांघाय कंपोजिट 0.१२ टक्क्याने वर चढला. युरोपातील बाजारांत सकाळी सकारात्मक कल दिसून आला. फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन येथील बाजार तेजी दर्शवित होते.

Web Title: Earthquake in Tata Sons; Shares Stock Market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.