Lokmat Money > बिझनेस न्यूज > कमीत कमी भांडवलात बक्कळ कमाई देणारे 'हे' तीन व्यवसाय, नक्की विचार करा...

कमीत कमी भांडवलात बक्कळ कमाई देणारे 'हे' तीन व्यवसाय, नक्की विचार करा...

जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल जेणेकरून तुम्हाला दरमहा लाखोंची कमाई करता येईल. तुम्ही घरबसल्या किराणा दुकान, मोबाईल आणि रिपेअरिंग व्यवसाय सुरू करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 04:16 PM2022-09-12T16:16:05+5:302022-09-12T16:16:33+5:30

जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल जेणेकरून तुम्हाला दरमहा लाखोंची कमाई करता येईल. तुम्ही घरबसल्या किराणा दुकान, मोबाईल आणि रिपेअरिंग व्यवसाय सुरू करू शकता.

easiest to do this business for good earning | कमीत कमी भांडवलात बक्कळ कमाई देणारे 'हे' तीन व्यवसाय, नक्की विचार करा...

कमीत कमी भांडवलात बक्कळ कमाई देणारे 'हे' तीन व्यवसाय, नक्की विचार करा...

जर तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल जेणेकरून तुम्हाला दरमहा लाखोंची कमाई करता येईल. तुम्ही घरबसल्या किराणा दुकान, मोबाईल आणि रिपेअरिंग व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायातून तुम्हाला अधिक नफा मिळेल आणि हळूहळू तुमची कमाईही लाखांमध्ये पोहोचेल. कोणताही व्‍यवसाय सुरू करण्‍यापूर्वी, तुम्‍हाला संबंधित व्‍यवसाय का सुरू करायचा आहे याची खात्री करून घेतली पाहिजे. या व्यवसायाचे तुमचं ध्येय काय आहे आणि तुम्हाला या व्यवसायातून किती वेळात भांडवल परत मिळवायचं आहे हे सर्व प्रथम या गोष्टी निश्चित करा, जेणेकरून आपल्याला व्यवसाय करताना कोणतेही नुकसान किंवा कोणतीही अडचण येणार नाही.

जास्तीत जास्त नफा मिळवून देणारे व्यवसाय-

किराणा दुकान (Grocery store)
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने नेहमीच चालतात मग ती गावात असोत किंवा शहरात तुम्ही तुमचं किराणा दुकान कुठेही चालवू शकता. कोरोनाच्या काळात जिथं सर्व प्रकारची दुकानं बंद होती, तिथं वैद्यकीय दुकानं आणि दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची दुकानं उघडण्यास सूट देण्यात आली होती. यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की किराणा दुकान तुमच्यासाठी असा व्यवसाय आहे जो तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. तुम्ही हळूहळू हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढवू शकता आणि त्यात इतर गोष्टींचाही समावेश करू शकता. ज्यातून तुम्ही चांगली कमाई करू शकता. त्याचबरोबर तुमच्या अनेक आर्थिक समस्या दूर होऊ शकतात.

मोबाइल आणि रिपेअरिंगचं दुकान (Mobile Repairing Business)
आजकाल मोबाईल हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा एक भाग बनला आहे आणि सध्या प्रत्येक काम मोबाईल द्वारे सहज केलं जातं. पण जेव्हा जेव्हा तुमचा मोबाईल खराब होतो तेव्हा तुम्ही मोबाईल रिपेअरिंगचं दुकान शोधू लागता आणि मोबाईल लवकर दुरुस्त करण्यासाठी कितीही रक्कम द्यायला तयार असता. अशा परिस्थितीत तुम्ही मोबाईल रिपेअरिंगचा व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायातून तुम्ही काही महिन्यांत चांगली कमाई देखील करू शकता.

फास्ट फूड सेन्टर (Fast Food Center)
लोकांमध्ये फास्ट फूडची संस्कृती झपाट्यानं वाढत असल्याचं तुम्ही पाहिलं असेल. फूड ट्रक/व्हॅन उघडून तुम्ही सहजपणे अधिक नफा कमावू शकता. कारण कोणतीही व्यक्ती अन्नाशिवाय राहू शकत नाही. अशा परिस्थितीत फास्ट फूडचा व्यवसाय तुम्हाला सर्वाधिक नफा देऊ शकतो. कारण सध्याच्या पिढीत फास्ट फूड खाण्याची क्रेझ सर्वाधिक आहे.

Web Title: easiest to do this business for good earning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.