मुंबई : भारत आणि अन्य तीन देशांच्या विद्यार्थ्यांसाठी कॅनडाने शैक्षणिक व्हिसा देण्याची प्रक्रिया अधिक सुलभ केली आहे. ‘स्टडी परमिट’ या नावाने ओळखला जाणारा कॅनडाचा विद्यार्थी व्हिसा आता अवघ्या ४५ दिवसांत मिळेल. याआधी त्यासाठी ६0 दिवस लागत होते. अलिकडच्या काळात अमेरिका आणि ब्रिटनने भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा देण्याच्या अटी अधिक जाचक केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कॅनडाचा हा निर्णय महत्त्वाचा ठरतो.‘स्टुडंट डायरेक्ट स्ट्रिम’ या नावाने हा नवा व्हिसा कार्यक्रम कॅनडा सरकारने सुरू केला आहे. चीन, व्हिएतनाम आणि फिलिपिन्स या देशांना त्याचा लाभ होईल. याआधी ‘स्टुडंट पार्टनर्स प्रोग्राम’ नावाने व्हिसा कार्यक्रम राबविला जात होता. त्यात विद्यार्थ्यांना कॅनडातील केवळ ४0 महाविद्यायांसाठी व्हिसा दिला जात होता.चीन सरकारच्या या नव्या व्हिसा कार्यक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना कॅनडातील सर्व मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांत प्रवेश घेता येऊ शकतो, अशी माहिती कॅनडाच्या इमिग्रेशन, निर्वासित आणि नागरिकत्व विभागाने दिली आहे.
भारतीय विद्यार्थ्यांना कॅनडाचा व्हिसा मिळणे सुलभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2018 4:06 AM