Join us

सलग दुसऱ्यांदा शेअर देतेय 'ही' कंपनी, रेकॉर्ड डेट उद्या; ५० रुपयांपेक्षा कमी किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 15:37 IST

Easy Trip Planners Ltd Share Price : शेअर बाजारात अशा मोजक्याच कंपन्या आहेत ज्या सातत्यानं बोनस शेअर्स देत आहेत.

Easy Trip Planners Ltd Share Price : शेअर बाजारात अशा मोजक्याच कंपन्या आहेत ज्या सातत्यानं बोनस शेअर्स देत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे इझी ट्रिप प्लॅनर्स लिमिटेड (Easy Trip Planners Ltd). कंपनी आज शेअर बाजारात एक्स-बोनस स्टॉक म्हणून व्यवहार करत होती. हे सलग तिसरं वर्ष आहे जेव्हा कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स भेट देत आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये गुरुवारी ४ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली आहे.

उद्या रेकॉर्ड डेट

एक्सचेंजला दिलेल्या माहितीत इझी ट्रिप प्लॅनर्सनं म्हटलंय, पात्र गुंतवणूकदारांला यावेळी एका शेअरवर एक शेअर बोनस दिला जाईल. कंपनीनं या बोनस इश्यूसाठी २९ नोव्हेंबर २०२४ ही रेकॉर्ड डेट तारीख जाहीर केली आहे. ती उद्या आहे.

कंपनीनं बोनस शेअर कधी दिले?

इझी ट्रिप प्लॅनर्सनं २०२२ आणि २०२३ मध्ये गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स देखील दिले. फेब्रुवारी २०२२ महिन्यात कंपनीनं एका शेअरसाठी बोनस म्हणून एक शेअर दिला होता. तर नोव्हेंबर महिन्यात कंपनीनं एका शेअरवर ३ शेअर्स बोनस म्हणून दिले होते. यावेळी कंपनीचे शेअर्स २ भागांमध्ये स्प्लिट करण्यात आले होते. त्यानंतर इझी ट्रिप प्लॅनर्सच्या शेअर्सची फेस व्हॅल्यू १ रुपये प्रति शेअर करण्यात आली.

विक्रमी तारखेच्या एक दिवस आधी इझी ट्रिप प्लॅनर्सच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. कंपनीचे शेअर्स ४.३० टक्क्यांहून अधिक वधारले. बीएसईवर कंपनीचा शेअर बुधवारच्या बंदच्या तुलनेत अधिक म्हणजे ३२.२३ रुपयांवर उघडला. काही काळानंतर कंपनीचा शेअर ३३.६५ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक