Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारतामध्ये उद्योगांसाठीचा मार्ग सोपा

भारतामध्ये उद्योगांसाठीचा मार्ग सोपा

उद्योगांसाठी नवीन मार्ग खुले झाले आहेत असे नव्हे, तर हे उद्योग आपले जुने बचावात्मक धोरण सोडून पुढे वाटचाल करीत आहेत, असे सीआयआयतर्फे सांगण्यात आले.

By admin | Published: June 8, 2016 04:03 AM2016-06-08T04:03:44+5:302016-06-08T04:03:44+5:30

उद्योगांसाठी नवीन मार्ग खुले झाले आहेत असे नव्हे, तर हे उद्योग आपले जुने बचावात्मक धोरण सोडून पुढे वाटचाल करीत आहेत, असे सीआयआयतर्फे सांगण्यात आले.

Easy way for industries in India | भारतामध्ये उद्योगांसाठीचा मार्ग सोपा

भारतामध्ये उद्योगांसाठीचा मार्ग सोपा


वॉशिंग्टन : परदेश धोरणात बदल झाल्याने भारतीय उद्योगांसाठी नवीन मार्ग खुले झाले आहेत असे नव्हे, तर हे उद्योग आपले जुने बचावात्मक धोरण सोडून पुढे वाटचाल करीत आहेत, असे सीआयआयतर्फे सांगण्यात आले.
अमेरिका-भारत आर्थिक संबंध आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यात होणाऱ्या शिखर परिषदेवरून सुरू असलेल्या चर्चेत सहभागी होताना सीआयआयचे अध्यक्ष नौशाद फॉर्ब्स यांनी हे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, विभागनिहाय रणनीती निश्चित करण्यात येत असल्याने भारतीय व्यापार अधिक फायदेशीर ठरेल आणि तोटा सहन करण्याची क्षमताही वाटेल. एकूणच उद्योगासाठी परिस्थिती अनुकूल बनत आहे. ते म्हणाले की, आतापर्यंत भारतीय व्यावसायिक बचावात्मक धोरण स्वीकारत असत. आता त्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. हा कार्यक्रम ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडिज’ने आयोजित केला होता. ते म्हणाले की, व्यवसाय सुलभता वाढविण्यासाठी ‘ई-बिझनेस’ पोर्टलसारखी नवीन पावले उचलण्यात आली. दिवाळखोरीविषयक विधेयक संमत झाले असल्यामुळे पारदर्शकता वाढली आहे. त्यामुळे देशांतर्गत, तसेच विदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे.
>व्यापार ५०० अब्ज डॉलरचा व्हावा
भारतीय व्यावसायिकांनी अमेरिकेत जवळपास १५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे आणि ९१ हजार लोकांना रोजगार दिला आहे. सध्या भारत आणि अमेरिका यांच्यात १०० अब्ज डॉलरचा व्यापार होतो. तो २०२५ पर्यंत वाढून ५०० अब्ज डॉलर व्हावा, अशी भारताची इच्छा आहे.

Web Title: Easy way for industries in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.