नवी दिल्ली - भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाच्या अधीन असलेली सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ईसीआयएल) मध्ये विविध प्रकल्पातील विभागांमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे सिलींग, वितरण, पोलिंग, कमिशनिंग आणि एफएलसीसाठी भरती जाहीर झाली आहे.
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यासंदर्भात बुधवार १९ ऑगस्ट रोजी टेक्निकल ऑफीसर ३५० पदांच्या भरतीसाठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे. ईसीआयसीएलच्या टेक्निकल ऑफिसरच्या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्याची प्रक्रिया १९ ऑगस्टपासून सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२० रोजी दुपारी २.०० वाजेपर्यंत आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार ecil.co.in या संकेतस्थळावर दिलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे भरतीसाठी अर्ज करू शकतील.
इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने टेक्निकल ऑफिसच्या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराने कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठामधून किमान ६० टक्के गुणांसह इंजिनिअरिंगची पदवी मिळवलेली असली पाहिजे. तसेच, संबंधित अर्जदाराला कामाचा तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार उमेदवाराचे वय ३० वर्षांहून अधिक असता कामा नये. मात्र आरक्षित वर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे.
ईसीआयएलमध्ये संविदेच्या आधारावर टेक्निकल ऑफिसरच्या पदांसाठी उमेदवारांना मेरिटच्या आधारावर प्रोव्हिजनल नियुक्ती दिली जाईल. इंजिनियरिंगच्या डिग्रीच्या आधारावर मिळालेल्या मेरिट लिस्टनुसार उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि जॉयनिंग फॉर्म्यालिटीसाठी उपस्थित राहावे लागेल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अंतिम ऑफर लेटर दिले जाईल.