नवी दिल्ली : केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होऊ घातल्याच्या काळात, महागाईवर नियंत्रण ठेवून औद्योगिक विकासाला प्राधान्य देण्यावर भर देणे गरजेचे राहील, जेणेकरून आर्थिक विकासाचा दर उंचावेल, असे मत निवडणूक विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. एचएसबीसी व आरबीएसने देशाच्या नव्या पंतप्रधानाचा संभाव्य प्राधान्यक्रम तयार केला आहे. सरकारला आर्थिक वृद्धी, चलन फुगवट्याचे प्रबंधन व रिझर्व्ह बँकेच्या संबंधांवर लक्ष द्यावे लागणार आहे. त्याचसोबत मूलभूत आराखड्याच्या क्षेत्राचा विकास आणि अनिश्चितता दूर करण्याला प्राधान्य दिले जावे लागणार असल्याचे या विश्लेषकांचे म्हणणे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आर्थिक विकासाला प्राधान्य हवे!
केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होऊ घातल्याच्या काळात, महागाईवर नियंत्रण ठेवून औद्योगिक विकासाला प्राधान्य देण्यावर भर देणे गरजेचे राहील
By admin | Published: May 17, 2014 05:17 AM2014-05-17T05:17:29+5:302014-05-17T05:17:29+5:30