नवी दिल्ली : चीनला मागे टाकत भारतीय अर्थव्यवस्था गतिमान होत २०१७-१८ या आर्थिक वर्षात भारताचा वृद्धीदर ७.४ टक्के आणि त्यानंतरच्या आर्थिक वर्षात ७.६ टक्के असेल, असा अंदाज आशियाई विकास बँकेने (एडीबी) व्यक्त केला.
पाचशे आणि हजार रुपायांच्या नोटा चलनातून बाद केल्याने निर्माण झालेला प्रभाव नवीन नोटा चलनात आणल्याने ओसरत आहे. वाढता खप आणि आर्थिक सुधारणांमुळे व्यावसायिक विश्वासासोबत गुंतवणुकीचे प्रमाणही वृद्धिंगत होईल, असा आशावाद आशियाई विकास बँकेच्या ‘आशिया विकास दृष्टिकोन’ या आर्थिक नियतकालिकाने व्यक्त केला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
आर्थिक वृद्धीत भारत चीनला मागे टाकणार
भारतीय अर्थव्यवस्था गतिमान होत २०१७-१८ या आर्थिक वर्षात भारताचा वृद्धीदर ७.४ टक्के आणि त्यानंतरच्या आर्थिक वर्षात ७.६ टक्के असेल
By admin | Published: April 7, 2017 12:18 AM2017-04-07T00:18:48+5:302017-04-07T00:18:48+5:30