मुंबई : देशाच्या आर्थिक विकास दरात (जीडीपी) २०१७-१८ मध्ये ०.४ टक्क्यांची घट झाली. २०१७-१८ चा जीडीपी ६.७ टक्के राहिल्याचे केंद्र सरकारने गुरुवारी घोषित केले. प्रामुख्याने कृषी, उत्पादन व खनिकर्म क्षेत्रात मोठी घट झाली.
२०१६-१७ मध्ये देशाचा जीडीपी ७.१ टक्के इतका होता. त्यात नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात
घट झाली.
पण २०१७-१८ च्या अखेरच्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) जीडीपी आश्चर्यकारकरीत्या ७.७ टक्क्यांवर पोहोचला. त्याआधीच्या तिन्ही तिमाहीत तो अनुक्रमे ५.६, ६.३ व ७ टक्के इतका होता.
२०१७-१८ या आर्थिक वर्षात नागरिकांच्या दरडोई उत्पन्नवाढीचा
दर ५.७ वरून ५.४ टक्क्यांवर
आला. नागरिकांच्या निव्वळ दरडोई उत्पन्नात ४४३९ रुपयांची वाढ
होऊन ते ८६,६६८ रुपये झाले. त्याचवेळी दरडोई खर्चातही ५.२
टक्के वाढ होऊन ते ५५,१६० रुपयांवर आले.
क्षेत्र २०१६-१७ २०१७-१८
कृषी ६.३ ३.४
खनिकर्म १३.० २.९
उत्पादन ७.९ ५.७
ऊर्जा ९.२ ७.२
बांधकाम १.३ ५.७
संरक्षण १०.७ १०.०
आर्थिक विकास दरात घट !
देशाच्या आर्थिक विकास दरात (जीडीपी) २०१७-१८ मध्ये ०.४ टक्क्यांची घट झाली.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 04:50 AM2018-06-01T04:50:36+5:302018-06-01T04:50:36+5:30