मुंबई : कोरोना व्हायरसमुळे झालेल्या देशव्यापी लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली असून, त्याबाबत प्रथमच रिझर्व्ह बॅँकेच्या गव्हर्नरांनी काही अंदाज व्यक्त केले आहेत. गेली चार दशके सातत्याने वाढत असलेला भारतीय अर्थव्यवस्थेचा चालू आर्थिक वर्षामध्ये प्रथमच शून्याखाली जाण्याची भीती रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केली.शुक्रवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दास यांनी रेपो ्रआणि रिव्हर्स रेपो दरामध्ये कपातीची घोषणा करतानाच अर्थव्यवस्थेच्या विकासदराबाबतही विधान केले. त्यामध्ये त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा विकार दर शून्याखाली जाण्याची भीतीही व्यक्त केली. कोरोनाचे हे संकट प्रथम जेवढे गंभीर वाटत होते त्यापेक्षा त्याने अधिक खोलवर परिणाम केल्याचे दास यांनी सांगितले. मात्र कोण्याही संकटाला तोंड देण्यासाठी भारत सक्षम असल्याचे स्पष्ट करून या परिस्थितीवरही लवकरच मात करू शकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कोरोना संकटाच्या आधीपासूनच भारतीय अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसू लागला होता, याची आठवण करून देताना दास यांनी सन २०१९-२० या आर्थिक वर्षामध्ये ४.९ टक्क्यांच्या अपेक्षित अंदाजापेक्षा विकासदर कमी झाल्याकडे लक्ष वेधले. कोरोनाच्या संकटामुळे होणाऱ्या नुकसानाचे प्रथमत: लावलेले अनुमान चुकले असून, या संकटाने अर्थव्यवस्थेच्या विविध अंगांवर मोठा आघात केला असल्याचे दास म्हणाले.देशातील मागणीमध्ये झालेली घट तसेच मागणी आणि पुरवठ्याच्या साखळीमध्ये निर्माण झालेली दरी यामुळे पहिल्या सहामाहीमध्ये अर्थव्यवस्था फारशी कार्य करू शकणार नाही. मात्र दुसºया सहामाहीमध्ये उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा आहे. हे बदल किती काळामध्ये होतात त्यावरच विकासाचा दर अवलंबून राहण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी उद्योग आणि शेतकरी यांना दिलेले पॅकेज हे नक्कीच लाभदायक असल्याचे दास यांनी सांगितले. अर्थव्यवस्थेमधील रोकड पुरवठा कायम राहील आणि कोणत्याही प्रकाराने पैशाची चणचण जाणवणार नाही, याकडे बॅँक बारकाईने लक्ष ठेवून आहे. गरज पडल्यास अधिक पैसा चलन-व्यवस्थेमध्ये आणण्याची आमची तयारी असल्याचेही दास यांनी स्पष्ट केले आहे.दोन महिन्यांमधील दुसरी दरकपातदोन महिन्यांमध्ये रिझर्व्ह बॅँकेने रेपो दरामध्ये दुसऱ्यांदा कपात केली आहे. याआधी २७ मार्च रोजी ०.७५ टक्क्यांनी रेपो दर कमी करण्यात आला होता. बॅँकेच्या आर्थिक धोरणविषयक समितीच्या बैठकीमध्ये एकमताने हा निर्णय झाल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले. केवळ एकाच सदस्याने दरामध्ये ०.२५ टक्के कपात सुचविली. मात्र उर्वरित सर्व सदस्यांनंी दर ०.४० टक्क्यांनी कमी करण्याचे मत मांडल्याचे त्यांनी सांगितले.उद्योगांनाही दिला दिलासाविविध उद्योगांना खेळत्या भांडवलाची गरज असते. त्यासाठी हे उद्योग बॅँकांकडून कर्ज घेत असतात. खेळत्या भांडवलासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णयही रिझर्व्ह बॅँकेने जाहीर केला आहे. या निर्णयामुळे लॉकडाउनच्या काळामध्ये बंद असलेल्या उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे.सध्या बॅँका उद्योगांना त्यांच्या भांडवलाच्या २५ टक्क्यांपर्यंत कर्ज देऊ शकतात. ही मर्यादा आता ३० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे.रिझर्व्ह बॅँकेच्या महत्त्वाच्या घोषणा- रेपो दरामध्ये ०.४० टक्क्यांनी कपात करून हा दर आणला ४ टक्क्यांवर- रिव्हर्स रेपो दरामध्ये ०.४० टक्के कपात. आता हा दर झाला ३.३५ टक्के- कर्जाचे हप्ते भरण्यासाठीची सवलत (मोरॅटोरिअम) आणखी तीन महिन्यांनी वाढविली.- चालू आर्थिक वर्षामध्ये अर्थव्यवस्थेचा संकोच होण्याचा अंदाज.- अर्थव्यवस्थेमध्ये ६० टक्के वाटा असलेली सहा प्रमुख राज्ये ही रेड आणि आॅरेंज झोनमध्ये.- अर्थव्यवस्थेच्या विविध घटकांवर मोठा ताण.- कृषिक्षेत्रवगळता अन्य क्षेत्रांमधील आर्थिक कारभार घटणार.- ३१ जुलैपूर्वी करण्यात आलेल्या आयातीवरील रक्कम भरण्यासाठीची मुदत ६ महिन्यांवरून १२ महिने.- एक्झिम बॅँकेला १५ हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्याबाबत मुदतवाढ.- एक्स्पोर्ट क्रेडिटसाठीची मुदत १२ महिन्यांवरून केली १५ महिने.- परकीय चलन गंगाजळीमध्ये ९.२ अब्ज डॉलरची वाढ.
आर्थिक विकासदर जाणार शून्याखाली, शक्तिकांत दास यांची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 1:07 AM