Lokmat Money > बिझनेस न्यूज > Budget 2020: नोकरीच्या शोधात आहात?... आर्थिक सर्वेक्षणातील 'हा' आकडा देईल मोठा आधार

Budget 2020: नोकरीच्या शोधात आहात?... आर्थिक सर्वेक्षणातील 'हा' आकडा देईल मोठा आधार

गेल्या अनेक दिवसांपासून रोजगार कपातीच्या बातम्या येत होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 04:29 PM2020-01-31T16:29:02+5:302020-01-31T18:35:08+5:30

गेल्या अनेक दिवसांपासून रोजगार कपातीच्या बातम्या येत होत्या.

economic survey 2020 4 crore jobs to be created 5 years | Budget 2020: नोकरीच्या शोधात आहात?... आर्थिक सर्वेक्षणातील 'हा' आकडा देईल मोठा आधार

Budget 2020: नोकरीच्या शोधात आहात?... आर्थिक सर्वेक्षणातील 'हा' आकडा देईल मोठा आधार

Highlightsआर्थिक पाहणी अहवालानुसार, येत्या पाच वर्षांत 4 कोटी नोकऱ्या उत्पन्न होणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शुक्रवारी संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. तसेच 2030पर्यंत या रोजगारांची संख्या 8 कोटींच्या घरात जाणार आहे. 

नवी दिल्लीः गेल्या अनेक दिवसांपासून रोजगार कपातीच्या बातम्या येत होत्या. परंतु लवकरच देशातील रोजगारात वाढ होणार असल्याचं समोर आलं आहे. देशातील रोजगारासंबंधी लवकरच चांगली बातमी येणार आहे. आर्थिक पाहणी अहवालानुसार, येत्या पाच वर्षांत 4 कोटी नोकऱ्या उत्पन्न होणार आहेत. ज्यांची संख्या 2030पर्यंत वाढून 8 कोटीपर्यंत जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शुक्रवारी संसदेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला. त्या अहवालात देशात चांगल्या वेतनाचे 4 कोटी रोजगार उपलब्ध होणार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तसेच 2030पर्यंत या रोजगारांची संख्या 8 कोटींच्या घरात जाणार आहे. 

आर्थिक सर्वेक्षण अहवालात भारताच्या निर्यात वाढीला प्रोत्साहन देण्यासाठी चीनसारखीच संधी आहे. भारतात ‘असेम्बल इन इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमांतर्गत जगभरातल्या निर्यात बाजारातील भारताची भागीदारी 2025पर्यंत 3.5 टक्के होणार आहे. जी पुढे वाढून 2030पर्यंत सहा टक्क्यांपर्यंत जाणार आहे. आर्थिक सर्वेक्षणाच्या माध्यमातून 2025पर्यंत भारताला पाच  5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी आवश्यक निर्यात मूल्यात एकतृतीयांश वृद्धी करणं आवश्यक आहे. 

Budget 2020: आर्थिक सर्वेक्षणात सामान्यांना दिलासा; टॅक्स स्लॅबमध्ये होऊ शकतो बदल

आर्थिक सर्वेक्षणात भारताला चीनसारखी रणनीती स्वीकारण्याचा सल्ला देण्यात आला आहे. जेणेकरून श्रमाधारित क्षेत्रात उत्पादन वाढवण्यासाठी प्रगती करावी लागणार आहे. तसेच उत्पादनांच्या मोठ्या स्तरावरील असेम्बलिंगच्या हालचालींवर विशेष लक्ष केंद्रित करण्याचंही सांगण्यात आलं आहे. आर्थिक पाहणी अहवालात श्रीमंत देशात निर्यात वाढवण्याचाही सल्ला दिला आहे.  

Budget 2020: आर्थिक सर्वेक्षणाच्या आकडेवारीने दिला पंतप्रधान मोदींच्या स्वप्नाला मोठा झटका

Web Title: economic survey 2020 4 crore jobs to be created 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.