Join us

Ai तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या जाणार? सरकारने दिली महत्वाची माहिती, पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 9:36 PM

Economic Survey 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज आर्थिक सर्वेक्षण सादर केले, ज्यात Ai चा मुद्द्याही मांडण्यात आला.

Economic Survey 2024 : केंद्र सरकार उद्या, (दि.23) देशाचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. त्यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी(दि.22) आर्थिक सर्वेक्षण सादर केले. आर्थिक सर्वेक्षण हा एक महत्त्वाचा दस्तावेज आहे, ज्याद्वारे भारतीय अर्थव्यवस्थेचा आर्थिक लेखाजोखा मांडला जातो. यादरम्यान, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आणि त्याचा रोजगारावर काय परिणाम होऊ शकतो, याचीही माहिती देण्यात आली.

AI चे फायदे आणि तोटे दोन्हीअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण सादर करताना सांगितले की, Ai नोकऱ्यांसाठी मोठे आव्हान म्हणून समोर येत आहे. यामुळे प्रत्येक क्षेत्रात आणि प्रत्येक कौशल्य स्तरावर समस्या निर्माण होऊ शकतात. आर्थिक सर्वेक्षणानुसार नवीन युगातील तंत्रज्ञान, म्हणजेच Ai मुळे उत्पादकता वाढेल, परंतु काही क्षेत्रांमध्ये रोजगारावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

कामाच्या पद्धतीत मोठा बदल होईलआर्थिक सर्वेक्षणानुसार, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आगमनाने सर्व क्षेत्रातील नोकऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. Ai मुळे भविष्यात काम करण्याच्या पद्धती बदलू शकतात. या बदलांपासून भारत दूर राहू शकणार नाही. जसजशी Ai आधारित प्रणाली अधिक स्मार्ट होत जाईल, तसतशी ती लवकर स्वीकारलीही जाईल, असेही या आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे. 

गुगल, मायक्रोसॉफ्टसारख्या कंपन्या Ai विकसित करत आहेतChatGPT निर्माता OpenAI, Google, Microsoft आणि जगभरातील इतर कंपन्या Ai तयार करत आहेत. अनेक कंपन्यांचा मोठ्या उद्योगांसाठी आणि कॉर्पोरेट्ससाठी Ai प्रणाली विकसित करण्यावर भर आहे. फोन कॉल, ग्राहक सेवा, कंटेट रायटिंग, ट्रांसलेशन, कोडिंग, प्रोग्रामिंग यांसारख्या कामांना ऑटोमेशनवर टाकण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित केले जात आहे.