मुंबई : इंधनाचे वाढते दर, कमकुवत होणारा रुपया व यामुळे आर्थिक क्षेत्रात निर्माण झालेल्या अस्थिरतेचे परिणाम कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्यावर होत असल्याचे सध्या दिसून येत आहे. जानेवारी ते जुलै २०१८ या काळात कुटुंबांचा आर्थिक बोजा गतवर्षीच्या तुलनेत २.३० टक्के वाढला आहे. स्टेट बँकेच्या अहवालात ही बाब समोर आली आहे.
या अहवालानुसार, २००८ ते २०१७ या कालावधीत कौटुंबिक बचतीमध्ये ६.८ टक्के घट झाली. त्याचदरम्यान रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी होती. यामुळे गुंतवणूक वा बचतीसाठी मालमत्ता खरेदीचा जोर कमी झाला. त्याचा परिणाम कुटुंबांच्या एकूण बचतीवर झाला. २०११-१२मध्ये कुटुंबाच्या एकूण बचतीत मालमत्तेचा वाटा ६७.३० टक्के होता. तो २०१७-१८ या वर्षात ५६.४० टक्क्यांवर आला. क्रेडिट कार्डधारकांच्या थकबाकीतही वर्षभरात वाढ झाली. कार्डधारकांची सरासरी थकबाकी मागील वर्षी ९,५८० रुपये होती. ती आता ११,३०९ रुपये झाली.
बचत कमी होत असल्याचे नागरिकांच्या हातातील खेळती रक्कम वाढली आहे. त्यातून क्रयशक्ती वाढली आहे.
महागाईच्या बोजामुळे कुटुंबांमध्ये आर्थिक तणाव
इंधनाचे वाढते दर, कमकुवत होणारा रुपया व यामुळे आर्थिक क्षेत्रात निर्माण झालेल्या अस्थिरतेचे परिणाम कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्यावर होत असल्याचे सध्या दिसून येत आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 03:58 AM2018-09-21T03:58:31+5:302018-09-21T03:58:46+5:30