clunkers scheme in china :चीन म्हटलं की तुमच्या डोळ्यांसमोर काय येतं? अवाढव्य देश, मोठी लोकसंख्या, वेगवान प्रगती, दळणवळणाचे देशभर जाळे अशा असंख्य गोष्टी येत असतील. उत्पादनाच्या बाबतीत तर चीनचा जगात कोणीही हात धरू शकणार नाही. युरोप, अमेरिकेतील दिग्गज कंपन्या चीनमध्ये आपलं उत्पादन करतात. मात्र, सध्या चीन मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या वर्षभरापासून मंदावलेल्या अर्थव्यवस्थेने मार्च महिन्यात चांगली रिकव्हरी केली. लवकरच अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल असं वाटत असतानाच आता ट्रम्प टॅरिफने मोठा धक्का दिला आहे. बाजारात पुन्हा मंदिचा धोका निर्माण झाला आहे.
चीनवर ट्रम्प टॅरिफची टांगती तलवारडोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाने संबंध जगाची आर्थिक घडी विस्कटली आहे. यामध्ये भारतासह अनेक देशांना फटका बसला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प २ एप्रिलपासून सर्व देशांवर “परस्पर” दर जाहीर करणार आहेत. चीनसोबतच्या व्यापारात असमतोल असून त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याचे ट्रम्प यांचे मत आहे. जानेवारीमध्ये व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंतर ट्रम्प यांनी आधीच सर्व चीनी आयातीवर २० टक्के शुल्क लागू केले आहे. अमेरिकेत बनवले जाणारे फेंटॅनाइल ह्या ड्रगसाठी येणारा कच्चा माल चीन पुरवत असल्याचा आरोप ट्रम्प यांचा आहे. या शुल्कयुद्धामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण होत आहे.
१४४ लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था हाताळण्याचे आव्हानचीनने आपले आर्थिक विकासाचे लक्ष्य यावर्षी "सुमारे ५ टक्के" राखले आहे. सरकार अधिक खर्च करून, कर्ज घेऊन आणि व्याजदर शिथिल करून १८ ट्रिलियन डॉलरची प्रचंड अर्थव्यवस्था स्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. निर्यातीवर धोक्याचे ढग दाटून आले आहेत, त्यामुळे आता देशांतर्गत वापर वाढवण्यावर भर दिला जात आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी अलीकडेच बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नेत्यांची भेट घेतली असून जागतिक पुरवठा साखळी वाचवण्याचे आवाहन केले.
चिनी मार्केटमध्ये ऑफर्सचा पाऊस“कॅश फॉर क्लंकर” ही चीनमध्ये सुरू करण्यात आलेली एक विशेष योजना आहे. लोकांना खरेदीसाठी प्रोत्साहन देणे आणि अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ही सरकारने सुरू केली आहे. याचा अर्थ 'जुन्याच्या बदल्यात नवे' असा होतो. जर कोणाकडे जुना फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशिन किंवा इतर कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू जी खराब झाली आहे किंवा खूप जुनी झाली आहे. या भंगार वस्तूंच्या बदल्यात ग्राहक नवीन वस्तू खरेदी करू शकतो. यासाठी सरकार किंवा कंपन्या ग्राहकांना सवलत किंवा काही पैसे देतात, जेणेकरून तुम्ही नवीन आणि चांगल्या वस्तू खरेदी करू शकता.
वाचा - सीएनजी-पीएनजी स्वस्त होणार? पाइपलाइनचे शुल्क बदलण्याचा प्रस्ताव, नेमकं काय आहे प्रकरण?
चिनी सरकारची इच्छा आहे, की लोकांनी जास्त खर्च करावा, जेणेकरून बाजारात पैसा फिरतो आणि कारखाने चालू राहतात. विशेषत: जेव्हा अमेरिकेशी व्यापार तणाव वाढत आहे आणि निर्यात कमी होऊ शकते, तेव्हा ही योजना देशांतर्गत वापर वाढवण्याचा एक चांगला मार्ग आहे.