Lokmat Money > बिझनेस न्यूज > दिलासा : अर्थव्यवस्था सावरतेय; तरुणांमधील बेरोजगारी घटतेय, एनएसओची माहिती

दिलासा : अर्थव्यवस्था सावरतेय; तरुणांमधील बेरोजगारी घटतेय, एनएसओची माहिती

जागतिक मंदी आणि महागाईच्या सावटाखालीही आर्थिक स्थैर्य ठेवून गतिमान विकास साधण्यास भारत सक्षम असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात एक अहवाल सादर केला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 02:53 PM2022-11-26T14:53:35+5:302022-11-26T14:55:27+5:30

जागतिक मंदी आणि महागाईच्या सावटाखालीही आर्थिक स्थैर्य ठेवून गतिमान विकास साधण्यास भारत सक्षम असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात एक अहवाल सादर केला आहे. 

Economy is recovering; Youth unemployment is decreasing, according to NSO | दिलासा : अर्थव्यवस्था सावरतेय; तरुणांमधील बेरोजगारी घटतेय, एनएसओची माहिती

प्रतिकात्मक फोटो.


नवी दिल्ली : देशातील राेजगार क्षेत्राच्या दृष्टीकाेनातून सकारात्मक माहिती समाेर आली आहे. शहरी भागातील १५ वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांमधील बेरोजगारीचा दर घटला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या जुलै-सप्टेंबर या तिमाहीत गेल्या वर्षीच्या तुलनेत बेरोजगारीचा दर घटून ७.२ टक्के झाला आहे.

‘राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालया’ने (एनएसओ) जारी केलेल्या ताज्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत बेरोजगारीचा दर ९.८ टक्के होता. याचाच अर्थ यंदा त्यात २.६ टक्के घट झाली आहे. सूत्रांनी सांगितले की, जुलै-सप्टेंबर २०२१ मध्ये कोविड-१९ साथीच्या निर्बंधांमुळे बेरोजगारीचा दर अधिक होता. त्यातून बाहेर पडल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था सातत्याने पुनरुज्जीवित होत आहे, असे या आकडेवारीवरून दिसते. 

गतिमान विकास साधण्यास देश सक्षम -
- जागतिक मंदी आणि महागाईच्या सावटाखालीही आर्थिक स्थैर्य ठेवून गतिमान विकास साधण्यास भारत सक्षम असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात एक अहवाल सादर केला आहे. 
- येणाऱ्या काही महिन्यांमध्ये खरिप पिक उत्पादन चांगले हाेणार असून त्यामुळे महागाई कमी हाेण्यास मदत हाेईल. याशिवाय व्यापार वृद्धी आणि राेजगाराच्या संधीही निर्माण हाेतील, असे अहवालात म्हटले आहे.
- मंदीच्या सावटामुळे निर्यातीवर परिणाम हाेण्याची शक्यता आहे. मात्र, त्यामुळे आर्थिक विकासाची गती कमी हाेणार नाही, असा विश्वास अहवालातून व्यक्त करण्यात आला आहे.

कशामुळे वाढली बेरोजगारी?
कोविड-१९ साथीच्या काळात लॉकडाऊनमुळे उद्योग व्यवसाय ठप्प झाले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा गेल्यावर्षी मोठा प्रभाव होता. त्यामुळे कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली होती. त्यामुळे बेरोजगारीचा दर वाढला होता.

१६व्या ‘कालबद्ध श्रमशक्ती सर्वेक्षणा’नुसार (पीएलएफएस), शहरी भागात एप्रिल-जून २०२२ मध्ये १५ वर्षे व त्यापेक्षा अधिक वयाच्या नागरिकांतील बेरोजगारीचा दर ७.६ टक्के राहिला.

महिला (१५ वर्षे त्यापेक्षा अधिक वयोगट) -
बेरोजगारीचा दर जुलै-सप्टेंबर २०२२ मध्ये घटून झाला ९.४%.
गेल्या वर्षी या कालावधीत तो ११.६ टक्के होता. 
९.५% एप्रिल-जून २०२२ या तिमाहीत तो ९.५ टक्के होता.  
 

Web Title: Economy is recovering; Youth unemployment is decreasing, according to NSO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.