Lokmat Money > बिझनेस न्यूज > अर्थव्यवस्थेवर बाह्य घटकांचा परिणाम नाही

अर्थव्यवस्थेवर बाह्य घटकांचा परिणाम नाही

२०१५ आणि २०१६ मध्ये जी-२० देशात भारताच्या आर्र्थिक वृद्धीचा दर सर्वात वेगवान, म्हणजे ७ ते ७.५ दरम्यान राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज मुडीज इन्व्हेस्टर

By admin | Published: October 23, 2015 02:47 AM2015-10-23T02:47:07+5:302015-10-23T02:47:07+5:30

२०१५ आणि २०१६ मध्ये जी-२० देशात भारताच्या आर्र्थिक वृद्धीचा दर सर्वात वेगवान, म्हणजे ७ ते ७.५ दरम्यान राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज मुडीज इन्व्हेस्टर

The economy is not affected by external factors | अर्थव्यवस्थेवर बाह्य घटकांचा परिणाम नाही

अर्थव्यवस्थेवर बाह्य घटकांचा परिणाम नाही

नवी दिल्ली : २०१५ आणि २०१६ मध्ये जी-२० देशात भारताच्या आर्र्थिक वृद्धीचा दर सर्वात वेगवान, म्हणजे ७ ते ७.५ दरम्यान राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज मुडीज इन्व्हेस्टर सर्व्हिसने वर्तविला आहे. सकारात्मक रेटिंग परिदृश्य व लवचिक वृद्धी यामुळे सुधारणांचा अंदाज येतो. यामुळे भारताच्या वृद्धीदरावर बाह्य घटकांचा कोणताही परिणाम होणार नाही, असेही मुडीजने म्हटले आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेला बाहेरील घटकांपासून धोका फारच कमी आहे. सकारात्मक धोरणात्मक सुधारणा व सुधारणांबाबत स्वीकारलेले लवचिक धोरण यामुळे भारतीय अर्थव्यवस्था स्थिर राहू शकते.
‘बीएए’ रेटिंग मिळालेल्या तुर्कस्तान, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत आणि इंडोनेशियावर आधारित हा अहवाल आहे. ज्या देशांच्या अर्थव्यवस्थेबाबत येथे चर्चा झाली, त्यात भारतीय अर्थव्यवस्थेला बाह्य घटकांपासून धोका कमी असल्याचे मत नोंदविण्यात आले. भारतातील सुधारणा पाहता कायदेविषयक वातावरण सुधारेल. पायाभूत प्रकल्पातील गुंतवणूक वाढेल. सरकारी कर्जाचे प्रमाण घटेल. उगवत्या अर्थव्यवस्था बाह्य घटकांपासून स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न करतात. मात्र अमेरिकेचे पतधोरण व चीनमधील अपेक्षेपेक्षा जास्त असलेली मंदी यांचा त्यावर परिणाम होऊ शकतो. मुडीजने आपल्या अहवालात या देशांपुढे असलेल्या विविध बाह्य घटकांच्या आव्हानाचाही उल्लेख केला आहे.

मुडीजचा अहवाल आज प्रकाशित करण्यात आला. त्यात भारतीय अर्थव्यवस्थेबाबत ही निरीक्षणे नोंदविण्यात आली. त्यात म्हटले आहे की, उगवत्या अर्थव्यवस्थेत धोका स्वीकारण्याच्या वेगवेगळ्या क्षमता असतात. त्याचा परिणाम २०१५-१६ मध्ये जागतिक आर्थिक स्थितीवर जाणवेल.

Web Title: The economy is not affected by external factors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.