Lokmat Money > बिझनेस न्यूज > अर्थव्यवस्था गंभीर मंदीत; जीडीपी घसरणार ४५ टक्के

अर्थव्यवस्था गंभीर मंदीत; जीडीपी घसरणार ४५ टक्के

भारताची अर्थव्यवस्था २०२०-२१ वर्षाच्या आॅक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीपासून वाढायला सुरुवात होईल व जीडीपी दर २० टक्के असेल, तर चौथ्या जानेवारी ते मार्च २०२१ या तिमाहीत हा दर १४ टक्के असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 03:30 AM2020-05-20T03:30:43+5:302020-05-20T03:31:08+5:30

भारताची अर्थव्यवस्था २०२०-२१ वर्षाच्या आॅक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीपासून वाढायला सुरुवात होईल व जीडीपी दर २० टक्के असेल, तर चौथ्या जानेवारी ते मार्च २०२१ या तिमाहीत हा दर १४ टक्के असेल.

The economy is in a severe recession; GDP to fall by 45% | अर्थव्यवस्था गंभीर मंदीत; जीडीपी घसरणार ४५ टक्के

अर्थव्यवस्था गंभीर मंदीत; जीडीपी घसरणार ४५ टक्के

मुंबई : सध्या सुरू असलेल्या कोविड-१९ लॉकडाऊनमुळे भारताची अर्थव्यवस्था इतिहासातील सर्वात गंभीर मंदीतून जात आहे. परिणामी २०२०-२१ या चालू वर्षाच्या जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) ४५ टक्के कमी होऊ शकते, असे भाकीत अमेरिकन मर्चंट बँकिंग कंपनी गोल्डमन सॅक्सने वर्तविले आहे. अर्थतज्ज्ञ प्राची मिश्रा व अ­ॅर्न्ड्यू टिल्टन यांनी तयार केलेल्या अहवालात भारताने लॉकडाउन संपल्यानंतर अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी २६५ अब्ज डॉलर्सचे (२१ लाख कोटी रुपये) पॅकेज तयार केल्याचा उल्लेख केला आहे. भारताची अर्थव्यवस्था २०२०-२१ वर्षाच्या आॅक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीपासून वाढायला सुरुवात होईल व जीडीपी दर २० टक्के असेल, तर चौथ्या जानेवारी ते मार्च २०२१ या तिमाहीत हा दर १४ टक्के असेल.

Web Title: The economy is in a severe recession; GDP to fall by 45%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.