Join us

अर्थव्यवस्था मंदीत; पंतप्रधान मोदींच्या सल्लागारांची कबुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:22 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच पुनर्रचना केलेल्या आर्थिक सल्लागार परिषदेचे चेअरमन विवेक देवरॉय यांनी अर्थव्यवस्था मंदीत आल्याची कबुली दिली आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच पुनर्रचना केलेल्या आर्थिक सल्लागार परिषदेचे चेअरमन विवेक देवरॉय यांनी अर्थव्यवस्था मंदीत आल्याची कबुली दिली आहे.आर्थिक सल्लागार परिषदेच्या पहिल्या बैठकीनंतर देवरॉय यांनी सांगितले की, मंदीच्या कारणांबाबत आमचे मतैक्य झाले. या कारणांची माहिती आम्ही पंतप्रधानांनाच देऊ. वित्तीय मजबुतीकरणाच्या मार्गापासून सरकारने ढळू नये, यावर मतैक्यझाले आहे. येते सहा महिने परिषदेने १0 मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करायचे ठरवले आहे. या घटकांत आर्थिक वृद्धी, रोजगार निर्मिती, औपचारिक क्षेत्र व एकीकरण, वित्तीय चौकट, पतधोरण, सार्वजनिक खर्च,आर्थिक शासनाच्या संस्था, कृषी आणि पशू संवर्धन, उपभोग आणि उत्पादन पद्धती आणि सामाजिक क्षेत्र यांचा समावेश आहे.

टॅग्स :अर्थव्यवस्थानरेंद्र मोदीसरकार