नवी दिल्ली : आगामी सहा महिन्यांत अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची शक्यता आहे. तथापि, क्षमतांचा कमी वापर आणि नफ्याच्या प्रमाणावरील दबाव यामुळे खाजगी गुंतवणूक हा चिंतेचा विषय बनलेला आहे. असोचेम बिजकॉन सर्वेक्षणातून माहिती समोर आली आहे.
सर्वेक्षणात म्हटले आहे की, आगामी काळात धारणा स्थिर राहण्याची शक्यता आहे. ६२.५ टक्के लोकांना असे वाटते की, जानेवारी ते मार्च २0१६ या काळात गुंतवणुकीच्या पातळीवर कोणताही बदल होणार नाही. अशा स्थितीत खाजगी क्षेत्रात गुंतवणुकीच्या कमतरतेचा सिलसिला सुरू राहील. असोचेमचे महासचिव डी.एस. रावत यांनी सांगितले की, सर्वेक्षणात सहभागी झालेल्या लोकांनी नफ्यावरील दबाव कायम राहील, अशी भीती व्यक्त केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अर्थव्यवस्था सुधारणार, पण गुंतवणुकीबाबत चिंता
आगामी सहा महिन्यांत अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची शक्यता आहे. तथापि, क्षमतांचा कमी वापर आणि नफ्याच्या प्रमाणावरील दबाव यामुळे खाजगी गुंतवणूक
By admin | Published: January 25, 2016 02:10 AM2016-01-25T02:10:13+5:302016-01-25T02:10:13+5:30