भारतीय अर्थव्यवस्थेला गेल्या चाळीस वर्षांतील सर्वात मोठा फटका बसला असून आर्थिक वर्ष २०२१ मध्ये भारताच्या जीडीपीमध्ये उणे ७.३ टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या वर्षाच्या चौथ्या तिमाहिमध्ये मात्र जीडीपीमध्ये १.६ टक्क्यांची वाढ झाली. यावरून आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली असून, सरकारने आता आपल्या चुका स्वीकाराव्यात आणि विरोधकांचे ऐकावं, असं म्हटलं होतं. दरम्यान, यानंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी चिदंबरम यांच्यावर पलटवार केला आहे.
"कोरोनाच्या संकटातही काँग्रेसकडून राजकारण सुरू आहे. काँग्रेसच्या नेतृत्वानं हा दृष्टीकोन आत्मसाद केला असून त्यालाच आपलं हत्यार बनवलं आहे. जागतिक संकटामध्ये ही वेळ नक्कीच कठीण आहे. परंतु भारतीय अर्थव्यवस्था आता मजबूत आहे. माजी अर्थमंत्र्यांनी कठीण आकड्यांकडे का दुर्लक्ष केलं याची कल्पना नाही," असं ठाकुर म्हणाले. "आपली अर्थव्यवस्था एखाद्या द्वीपाप्रमाणे निराळी आहे का? या महासाथीमुळे अनेक प्रमुख अर्थवस्थांवर परिणाम झाला नाही का? फ्रान्स, जर्मनी, इटली, युकेच्या अर्थव्यवस्थांमध्ये अनुक्रमे ८.२ टक्के, ४.९ टक्के, ८.९ टक्के आणि ९.९ टक्क्यांची घसरण झाली आहे हे तुम्हाला माहित नाही का? कॅनडा, रशिया, दक्षिण आफ्रिका, अमेरिका यांसारख्या देशांच्या जीडीपीमध्येही घरसर झाली आहे," असं चिदंबरम यांना प्रतुत्तर देताना ठाकुर म्हणाले.
Dear Sh P Chidambaram ji,
— Anurag Thakur (@ianuragthakur) June 2, 2021
Is the Indian economy an island in isolation; have other major economies not faced a GDP contraction?
France,Germany,Italy,UK contracted by 8.2%,4.9%,8.9% & 9.9%
Canada, Russia, South Africa, USA too have seen GDP contraction in the past year.
1/n
"लॉकडाऊनमुळे अनेकांचे जीव वाचवण्यात आपल्याला यश मिळालं. त्यानंतर हळूहळू अर्थव्यस्थेला चालना देण्यासाठी हिरवा झेंडा दाखवत अनलॉक करण्यात आलं," असंही त्यांनी नमूद केलं. "आतापर्यंत १.४४ लाख कोटी रूपयांचा जीएसटी जमा झाला असून तो आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. प्रवासी वाहनांची विक्री, दुचाकी वाहनांची विक्री, सीमेंट उत्पादन, आंतरराष्ट्रीय एअर कार्गो अशा सहित अनेक क्षेत्रांमध्ये वाढ झाली आहे. हाय फ्रिक्वेन्सी मासिक कोअर सेक्टर डेटामधून हेदेखील दिसतं की ८ प्रमुख उद्योगांमध्ये रिबाऊंडही दिसून आलं आहे," असं ठाकुर यांनी स्पष्ट केलं.
Only an Ostrich would deny this graph is V shaped. pic.twitter.com/2njNojUsGk
— Anurag Thakur (@ianuragthakur) June 2, 2021
काय म्हणाले होते चिदंबरम?
"ज्याचा अंदाज लावला जात होता, तेच घडले. २०१८-१९ मधील जीडीपी १४०,०३,३१६ कोटी होता. २०१९-२० मध्ये ते १४५,६९,२६८ कोटी रुपये झाला होता आणि २०२०-२१ मध्ये ते १३५,१२,७४० कोटी रुपयांवर आला. २०२०-२१ हे वर्ष देशाच्या अर्थव्यवस्थेचे गेल्या चार दशकांतील सर्वात अंध:कारमय वर्ष आहे," असा दावा चिदंबरम यांनी केला होता. गतवर्षी कोरोना साथीच्या आजाराने पहिली लाट मंदावली, तेव्हा अर्थमंत्री आणि मुख्य आर्थिक सल्लागार अर्थव्यवस्था रुळावर परत येण्यासंदर्भात बोलू लागले. तेव्हा प्रोत्साहन पॅकेजच्या स्वरुपात अर्थव्यवस्थेला भक्कम पाठबळाची आवश्यकता होती. निश्चितच कोरोना साथीचा अर्थव्यवस्थेवर व्यापक परिणाम झाला आहे. परंतु, अकार्यक्षमता आणि आर्थिक व्यवस्थापनातील गोंधळाने अर्थव्यवस्थेची अवस्था आणखी बिकट केल्याची टीका पी. चिदंबरम यांनी केली.