नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाच्या वाढत चाललेल्या किमती व डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची सुरू असलेली घसरण अशा दुहेरी समस्येमुळे मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर्स भारताच्या अर्थव्यवस्थेचे खराब प्रदर्शन सूचित करीत आहेत. सरकारच्या अंदाजानुसार ३१ मार्च रोजी संपणाऱ्या २0१८/१९ या चालू आर्थिक वर्षात चालू खात्याचा तोटा (करंट अकाउंट डेफिसिट) वाढेल, असा अंदाज आहे. तसेच या तोट्याची वाढ सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) २.५ टक्क्यांपर्यंत होईल, अशी माहिती माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
हे वास्तव लक्षात घेता, यूपीए सरकारच्या कालखंडातील जर्जर झालेली अर्थव्यवस्था आता त्या अवस्थेतून बाहेर पडत आहे, हा सरकारचा दावा फोल ठरतो आहे. अर्थ मंत्रालयाचे अधिकारी म्हणतात, लवकरच ही स्थिती सुधारण्याची आशा आहे. परंतु करंट खात्याचा २.५ टक्क्यांचा तोटा देशाला काही काळ सहन करावा लागणार आहे. २0१६/१७ साली करंट अकाउंट डेफिसिट फक्त 0.६ टक्के होता तर २0१७/१८च्या आर्थिक वर्षात तो जीडीपीच्या १.९ टक्क्यांपर्यंत वाढला. करंट अकाउंट तोट्यातील घसरणीचा पहिला संकेत ७ सप्टेंबर रोजी रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या आकडेवारीतून सामोर आला होता. या आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे की, आर्थिक वर्ष २0१८/१९च्या पहिल्या तिमाहीत करंट अकाउंट डेफिसिटमधे वाढ झाली आहे.
करंट अकाउंट डेफिसिट
म्हणजे काय?
देशात आयात केल्या जाणाºया वस्तू व सेवांचे मूल्य निर्यात होणाºया वस्तू व सेवांच्या मूल्यापेक्षा अधिक झाले तर त्याला करंट खात्याचा तोटा (सीएडी) असे म्हणतात. त्याचे मोजमाप सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या टक्केवारीत केले जाते.
२0१८च्या सुरुवातीला डॉलरच्या तुलनेत रुपयाची १३ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. आता जून ते सप्टेंबरच्या दरम्यान त्यात आणखी ७ टक्क्यांची मोठी घसरण झाली. गेल्या ५ वर्षांत डॉलरच्या तुलनेत रुपया १५.५२ टक्के खाली आला.
रुपयाच्या घसरणीमुळे व
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने अर्थव्यवस्थेसमोर अनेक नवी आव्हाने उभी राहिली आहेत.
>२0१८/१९ वर्षांसाठी असलेले अंदाज
जीडीपीतील सीएडी
संस्था टक्केवारी
मूडीज २.५
नोमुरा २.८
एसबीआय २.८
आयसीआरए २.५
इंडिया रेटिंग्ज २.६
अर्थव्यवस्थेचे गुलाबी चित्र रंगविणारा केंद्राचा दावा फोल
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाच्या वाढत चाललेल्या किमती व डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची सुरू असलेली घसरण अशा दुहेरी समस्येमुळे मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर्स भारताच्या अर्थव्यवस्थेचे खराब प्रदर्शन सूचित करीत आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 12:29 AM2018-09-12T00:29:33+5:302018-09-12T00:29:43+5:30