Lokmat Money > बिझनेस न्यूज > खाद्यतेल स्वस्त! सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार, तेल २० रुपयांनी स्वस्त होणार

खाद्यतेल स्वस्त! सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार, तेल २० रुपयांनी स्वस्त होणार

Eating Oil Price: गुरुवारी ब्रँडेड खाद्य तेल उत्पादकांनी पाम, सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या किमतीत २० रुपयांपर्यंत कपात करण्याची  घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात किमती कमी झाल्यामुळे देशांतर्गत किमतीही कमी करण्याचा निर्णय खाद्य तेल उत्पादकांनी  घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 09:13 AM2022-06-18T09:13:22+5:302022-06-18T09:14:20+5:30

Eating Oil Price: गुरुवारी ब्रँडेड खाद्य तेल उत्पादकांनी पाम, सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या किमतीत २० रुपयांपर्यंत कपात करण्याची  घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात किमती कमी झाल्यामुळे देशांतर्गत किमतीही कमी करण्याचा निर्णय खाद्य तेल उत्पादकांनी  घेतला आहे.

Edible oil is cheap! The common man will get great relief, oil will be cheaper by 20 rupees | खाद्यतेल स्वस्त! सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार, तेल २० रुपयांनी स्वस्त होणार

खाद्यतेल स्वस्त! सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार, तेल २० रुपयांनी स्वस्त होणार

नवी दिल्ली : गुरुवारी ब्रँडेड खाद्य तेल उत्पादकांनी पाम, सूर्यफूल आणि सोयाबीन तेलाच्या किमतीत २० रुपयांपर्यंत कपात करण्याची  घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात किमती कमी झाल्यामुळे देशांतर्गत किमतीही कमी करण्याचा निर्णय खाद्य तेल उत्पादकांनी  घेतला आहे.

खाद्य तेल उत्पादन करणाऱ्या सर्वच मोठ्या कंपन्यांनी किमती कमी केल्या आहेत. अदाणी विलमर, रुची सोया, जेमिनी एडिबल्स ॲण्ड फॅट्स इंडिया, मोदी नॅचरल्स, गोकुल री-फॉयल ॲण्ड सॉल्वंट, विजयसॉल्वेक्स, गोकुळ ॲग्रो रिसोर्सेस आणि एन. के. प्रोटीन यांचा त्यामध्ये समावेश आहे.  सूत्रांनी सांगितले की, किमती कमी झाल्यामुळे तेलाची मागणी वाढण्याची शक्यता आहे. किरकोळ क्षेत्रातील महागाईही त्यामुळे कमी होईल. खाद्य तेल व स्निग्धांश श्रेणीतील महागाई मेमध्ये १३.२६ टक्क्यांवर होती.

अदाणी विल्मरचे एमडी अंगशु मलिक यांनी सांगितले की, सरकारच्या सूचनेनुसार तसेच ग्राहकांच्या हितासाठी आम्ही खाद्य तेलाच्या किमतीत कपात करत आहोत. नवीन एमआरपी असलेले तेल पुढील आठवड्यात बाजारात येईल.

दोन कारणांमुळे किमती झाल्या कमी? 
सरकारने कच्च्या सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात कपात केल्यामुळे तेलाच्या किमती कमी करण्यास कंपन्यांना मदत झाली आहे. 
मागील काही आठवड्यांपासून अर्जेंटिना आणि रशिया यासारख्या प्रमुख निर्यातदार देशांनी सूर्यफूल तेलाचा पुरवठा सुरू केला आहे. त्यामुळे किमती आणखी कमी होण्यास मदत झाली आहे.

तेल स्वस्त
पामतेल ७ ते ८ रु.
सूर्यफूल १० ते १५ 
सोयाबीन ५ रुपये

७०% 
सूर्यफूल तेलाची विक्री ही दक्षिण राज्ये आणि ओडिशामध्ये होते. 
१.३ 
कोटी टन खाद्य तेल भारत दरवर्षी आयात करतो.
६०% 
एवढ्या प्रमाणात आपण आयात केलेल्या खाद्य तेलावर अवलंबून आहोत.
काय होती समस्या 
मागील एक वर्षात खाद्य तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. हा सरकारसाठी चिंतेचा विषय आहे. जागतिक बाजारातील दरवाढीमुळे किमती वाढल्या होत्या. 
हैदराबादमधील जेमिनी एडिबल्स ॲण्ड फॅट कंपनीने गेल्या आठवड्यात फ्रीडम सूर्यफूल तेलाच्या एक लिटर पाऊचची किंमत १५ रुपयांनी कमी करून २२० रुपये केली होती. आता २० रुपयांची कपात होऊन किंमत २०० रुपये होईल.

Web Title: Edible oil is cheap! The common man will get great relief, oil will be cheaper by 20 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.