Join us

आनंदाची बातमी! खाद्यतेल स्वस्त होणार, सरकारने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 4:52 PM

देशात आता खाद्यातेल स्वस्त होऊ शकते. सरकारने रिफाइंड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे.

देशातील सर्वसामान्य जनतेला आता दिलासा मिळणार आहे. सरकारने रिफाइंड सोयाबीन तेल आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क १७.५ टक्क्यांवरून १२.५ टक्के केले आहे. या संदर्भात अर्थ मंत्रालयाने गुरुवारी एक अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी आणि किमती नियंत्रित करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

व्हेनेझुएलापासून नायजेरियापर्यंत..., 'या' 10 देशांमध्ये सर्वाधिक महागाई!

 भारत रिफाइन्डऐवजी 'कच्च्या' सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात करतो. असे असतानाही सरकारने रिफाइंड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. या कपातीमुळे रिफाइंड खाद्यतेलांवरील प्रभावी शुल्क १३.७ टक्क्यांवर पोहोचले आहे. सर्व प्रमुख कच्च्या खाद्यतेलांवरील प्रभावी शुल्क ५.५ टक्के आहे.

या निर्णयाचा बाजारातील भावावर काही तात्पुरता परिणाम होऊ शकतो, पण त्यामुळे आयात वाढणार नाही. “सामान्यत: सरकार खाद्यतेलाच्या किमती नियंत्रणात ठेवू इच्छिते. क्रूड आणि रिफाइंड सोयाबीन आणि सूर्यफूल तेल यांच्यातील कमी शुल्क फरक असूनही रिफाइन्ड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही. या निर्णयाचा बाजारातील भावावर तात्पुरता परिणाम होईल, असं मत काही व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे. 

सध्या रिफाइंड सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात नाही. एसईएच्या म्हणण्यानुसार केरळमध्ये मान्सून सुरू होण्यास आठवडाभर उशीर झाल्यामुळे पेरण्या लांबल्या आहेत. “हवामान विभागाने मान्सून जवळपास सामान्य राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. एल निनो पूर्णपणे नाकारण्यात आलेला नाही आणि त्यामुळे सामान्य मान्सूनच्या संभाव्यतेला धक्का बसू शकतो, ज्यामुळे खरीप पिकासाठी आणि पुढील तेल वर्ष २०२३-२४ साठी भाजीपाला तेलांच्या घरगुती उपलब्धतेवर परिणाम होईल.

टॅग्स :तेल शुद्धिकरण प्रकल्पसरकारकर