Lokmat Money > बिझनेस न्यूज > देशात खाद्य तेलाच्या किंमतीत विक्रमी वाढ; महागाईनं जनता त्रस्त, सरकारही चिंतेत..!

देशात खाद्य तेलाच्या किंमतीत विक्रमी वाढ; महागाईनं जनता त्रस्त, सरकारही चिंतेत..!

सोमवारी खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाने खाद्य तेलाच्या वाढत्या किंमतींसंदर्भात, संबंधित सर्व पक्षांशी चर्चा केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 02:24 PM2021-05-26T14:24:18+5:302021-05-26T14:25:48+5:30

सोमवारी खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाने खाद्य तेलाच्या वाढत्या किंमतींसंदर्भात, संबंधित सर्व पक्षांशी चर्चा केली.

edible oil Price reaches 11 year high in india | देशात खाद्य तेलाच्या किंमतीत विक्रमी वाढ; महागाईनं जनता त्रस्त, सरकारही चिंतेत..!

देशात खाद्य तेलाच्या किंमतीत विक्रमी वाढ; महागाईनं जनता त्रस्त, सरकारही चिंतेत..!

नवी दिल्ली - कोरोना महामारीबरोबरच वाढत्या महागाईनेही जनता त्रस्त झाली आहे. देशात खाद्य तेलाच्या किमतीही सातत्याने वाढत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या दशकाचा विचार करता, या महिन्यात खाद्य तेलाच्या किंमतीत विक्रमी वाढ झाली आहे. (Edible oil Price reaches 11 year high in india)

सोमवारी खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाने खाद्य तेलाच्या वाढत्या किंमतींसंदर्भात, संबंधित सर्व पक्षांशी चर्चा केली. या बैठकीत विभागाने राज्यांबरोबरच व्यापाऱ्यांनाही खाद्य तेलाच्या किंमती कमी करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यास सांगितले आहे. 

बैठकीनंतर विभागाने जारी केलेल्या निवेदनानुसार, "गेल्या काही महिन्यांत आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत भारतात खाद्य तेलाच्या किंमती मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. यावर खुद्द केंद्र सरकारनेही चिंता व्यक्त केली आहे. यानंतर खाद्य तेलाच्या व्यापाराशी संबंधित सर्व पक्षांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले होते." भारतात खाद्य तेलाची 60 टक्के आयात परदेशातून होते. यामुळे हा मुद्दा आंतरराष्ट्रीय किंमतींसोबत जोडून पाहिला जातो.

जानेवारी 2010 नंतर आतापर्यंतची सर्वाधिक किंमत -
स्टेट सिव्हिल सप्लाईज डिपार्टमेन्टच्या आकडेवारीनुसार, देशातील रिटेलमध्ये खाद्य तेलाचे मासीक सरासरी दर जानेवारी 2010 पासून आतापर्यंत सर्वोच्च स्थरावर पोहोचले आहेत. हे आकडे ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. मंगळवारी आलेल्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात मोहरीच्या तेलाची सरासरी किंमत 164.44 रुपये प्रती किलो ग्रॅमवर पोहोचली. गेल्या मे महिन्याचा विचार करता, ही किंमत 39 टक्के अधिक आहे. मे 2020 मध्ये मोहरीच्या तेलाची सरासरी किंमत 118.25 रुपये प्रति किलो ग्रॅम एवढी होती. भारतातील बहुतांश घरांत भोजन बनविण्यासाठी याच तेलाचा वापर केला जातो. मे 2010 मध्ये या तेलाची किंमत 63.05 रुपये प्रति किलो ग्रॅम होती.

भारतातील अनेक घरांत पाम ऑईलचाही वापर केला जातो. मे महिन्यात या तेलाची सरासरी किंमत 131.69 रुपये प्रति किलो ग्रॅम होता. गेल्या वर्षीच्या तिलनेत हे दर 49 टक्के अधिक होते. मे 2020 मध्ये पाम ऑईलचा सरासरी दर  88.27 रुपये प्रति किलो ग्रॅम होता. तर एप्रिल 2010 मध्ये याचा दर 49.13 रुपये प्रति किलो ग्रॅम होता. इतर तेलांच्या सरासरी दराचा विचार करता, शेंगदाना तेल 175.55 रुपये, वनस्पती तेल 128.7 रुपये, सोयाबीन तेल 148.27 रुपये आणि सनफ्लावर तेल 169.54 रुपये प्रति किलो ग्रॅमवर पोहोचले आहे. गेल्या वर्षींच्या तुलनेत या तेलांच्या सरासरी किंमतीत 19 ते 52 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. 

Web Title: edible oil Price reaches 11 year high in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.